Goa: किनारपट्टी व्यवस्थापन मसुद्याच्या कायदेशीर वैधतेला जनसुनावणीत आव्हान

आराखडा मसुदाच बेकायदेशीर असल्याचा आरोप आज मडगावात (Madgaon) झालेल्या किनारपट्टी आराखडा जन सुनावणीच्यावेळी पर्यावरणवाद्यांनी केला.
Public Hearing
Public HearingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: गोव्यात (Goa) जो किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा मसुदा (Coastal Management Plan) तयार केला आहे तो प्रादेशिक आराखडा सामावून करावा असे कायदा म्हणत असताना हा मसुदा तयार करताना प्रादेशिक आराखडा त्यात दाखविलाच नसल्याने हा आराखडा मसुदाच बेकायदेशीर असल्याचा आरोप आज मडगावात (Madgaon) झालेल्या किनारपट्टी आराखडा जन सुनावणीच्यावेळी पर्यावरणवाद्यांनी केला.

Public Hearing
Goa: मासे आणि गोवा; नेमके नाते काय?

ही जनसुनावणी म्हणजे निव्वळ फार्स असून हा मसुदा तयार करताना मासेमारी वस्त्या, मासे पैदास जागा, भरतीच्या जागा दाखविण्यात आलेल्या नाहीत. हा मसुदा तयार करताना सरकारी खात्याकडून माहिती गोळा करायची असते, मात्र अशी कोणतीही माहिती गोळा न करता केवळ एरियल फोटो वरून हा मसुदा तयार केला असल्याने हा मसुदा वस्तुस्थितीला धरून नाही त्यामुळे ही सुनावणी रद्द करून सर्व माहिती गोळा केल्यावरच मसुदा तयार करावा आणि सुनावणी घ्यावी अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com