Goa: अखेर दिल्लीच्या लिटल फ्लॉवर चर्चने ‘आप’ला दिली क्लिन चिट

केजरीवाल यांच्यावर विश्वास : (Arvind Kejariwal) चर्चने प्रसिद्ध केले निवेदन
Lettle Flower Church Delhi Goa Leader Churchil
Lettle Flower Church Delhi Goa Leader ChurchilDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गेल्या दोन आठवड्यांपासून भाजप, (Bjp) कॉंग्रेस (Congress) आणि चर्चिल आलेमाव (Churchil Alemao Goa) यांनी सुरू केलेल्या जातीयवादी राजकारणाला विश्रांती देण्यासाठी दिल्लीतील लिटल फ्लॉवर चर्चने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्या वक्तव्यावर त्यांचा विश्वास आहे आणि ते त्यांना न्याय देतील, असा विश्वास त्यांना असल्याचे चर्चने म्हटले आहे. चर्चने खुलासा केल्यामुळे या विध्वंसासाठी डीडीए चालवणाऱ्या भाजपवर हा आरोप उलटवला असून कॉंग्रेस तसेच आलेमाव इतक्या उत्साहाने भाजपला दोष देण्यापासून का रोखत आहेत, असा प्रश्न या निमित्ताने ‘आप’ने उपस्थित केला आहे. चर्चच्या पत्राचा पूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे आहे : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विधानावर आमचा विश्वास आहे. दिल्लीतील आम आदमी पार्टीला किंवा त्यांच्या सरकारला दिल्लीतील लिटल फ्लॉवर चर्च उद्ध्वस्त करण्याविषयी काहीही माहिती नव्हती. असे दिसते की, काही स्थानिक अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे संबंधित सरकारला माहिती न देता ते उद्ध्वस्त केले. मुख्यमंत्र्यांनी हा विध्वंस झाल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि यासंदर्भात आम्हाला पूर्ण सहकार्य आणि न्यायाची ग्वाही दिली आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे.

Lettle Flower Church Delhi Goa Leader Churchil
Goa: रगाडा नदीवरील मिनी पूल वाहून गेल्याने पैकूळ गावाचा संपर्क तुटला

आम्ही आमची धार्मिक कार्ये सुरू ठेवण्यासाठी यापुढे विलंब न करता या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची अपेक्षा करतो. म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करतो की, या घटनेला राजकीय मुद्दा बनवू नये. ‘आप’चे नेते कॅप्टन वेंझी व्हिएगस यांनीही ‘दिल्लीत चर्चिल आलेमाव का होते?’ (Churchil Alemao) असे विचारत निवेदन प्रसिद्ध केले. पोलिसांच्या देखरेखीखाली असलेल्या जागेला भेट देण्याची परवानगी त्यांना कोणी दिली? चर्चिल यांनी भाजपमधील कुणाच्या हितसंबंधांचा यासाठी वापर केला? दिल्ली पोलिस थेट अमित शाह यांच्या अंकित आहेत, तरीही आपल्याला मंजुरी कशी मिळाली? लुईस बर्जर (Luis Burger) प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यापासून अमित शहा यांच्याशी केलेल्या त्यांच्या कराराचा हा भाग आहे का? ही सर्व उत्तरे गोव्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यांच्यावर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत दोघांवरही आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांनी भाजपला पुरवलेली ही सेवा आहे का?’ ‘कॉंग्रेस आणि आलेमाव यांचा गोंयकारांचे ध्रुवीकरण आणि विभाजन करण्याचा हा प्रयत्न आहे. हे पत्र त्यांच्या खोट्या गोष्टी उघडकीस आणते. अरविंद केजरीवाल लिटल फ्लॉवर चर्चला न्याय देतील!’, असे कॅप्टन वेंझी व्हिएगस म्हणाले.

Lettle Flower Church Delhi Goa Leader Churchil
Goa: दारूची तस्करी बंद करा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com