91.45% गोमंतकीयांचा टेलिफोनला 'बाय बाय'! वापरकर्त्यांची संख्‍या 1.32,261 वरून 11,314

Goa landline usage drop: मोबाईलचे दिवस सुरू होण्‍याआधी संभाषणासाठी महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या टेलिफोनच्‍या वापरात गेल्‍या अकरा वर्षांत ९१.४५ टक्‍क्‍यांची घट झालेली आहे.
Goa landline usage drop
Goa landline usage dropDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोबाईलचे दिवस सुरू होण्‍याआधी संभाषणासाठी महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या टेलिफोनच्‍या वापरात गेल्‍या अकरा वर्षांत ९१.४५ टक्‍क्‍यांची घट झालेली आहे. या काळात राज्‍यातील टेलिफोनची संख्‍या १,३२,२६१ वरून ११,३१४ झाल्‍याचे नियोजन, सांख्‍यिकी आणि मूल्‍यमापन खात्‍याच्‍या अहवालातून समोर आली आहे.

मोबाईलचा प्रचार आणि प्रसार होण्‍याआधी सर्वसामान्‍य जनता संभाषणासाठी टेलिफोनचा वापर करीत होती. परंतु, नंतरच्‍या काळात टेलिफोनची जागा मोबाईलने घेतली. मोबाईलद्वारे कधीही आणि कुठेही बसून संभाषण करता येत असल्‍यामुळे गोमंतकीय नागरिकांनी टेलिफोनकडे काणाडोळा करीत मोबाईल खरेदी करण्‍यास पसंती दिली.

Goa landline usage drop
Goa Politics: विरोधकांच्‍या युतीचे भिजत घोंगडे कायम! काँग्रेसची आज बैठक; मनोज परब, वीरेश बोरकर यांच्‍या दिल्ली दौऱ्यावरून प्रश्‍‍नचिन्‍ह

त्‍यामुळे एकेकाळी संभाषणासाठी महत्त्‍वपूर्ण असलेल्‍या टेलिफोनच्‍या संख्‍येत गेल्‍या ११ वर्षांच्‍या काळात कमालीची घट झाली. २०१३–१४ या वर्षांत राज्‍यात एकूण १,३२,२६१ इतके टेलिफोन होते.

Goa landline usage drop
Butterflies In Goa: 'ताकदवान क्रूजर युद्धनौकांवरुन नाव दिलेले, गोव्यात सर्वत्र आढळणारे फुलपाखरु'; फुलपाखरांतील राजेशाही

परंतु, २०२४–२५ पर्यंत त्‍यात ९१.४५ टक्‍क्‍यांची घट होऊन हा आकडा ११,३१४ झाला. राज्‍यातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्‍ही भागांतील टेलिफोन वापरात घट झाल्‍याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com