Lotulim Land Scam: लोटलीत जमीन विक्री घोटाळा उघड! राजकारण्याची गुंतवणूक असल्याचे उघड; संशयित ज्येष्ठ महिलेवर गुन्हा

Goa land scam: राज्यात जमीन घोटाळा प्रकरण गाजत असतानाच असाच एक घोटाळा लोटली येथे घडला आहे. या जमीन खरेदी प्रकरणात एक राजकारणीही गुंतला असल्याचे उघड झाले आहे.
Goa Land Scam
Goa Land ScamDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : राज्यात जमीन घोटाळा प्रकरण गाजत असतानाच असाच एक घोटाळा लोटली येथे घडला आहे. या जमीन खरेदी प्रकरणात एक राजकारणीही गुंतला असल्याचे उघड झाले आहे. गिरीश कुमार पिल्लई असे त्याचे नाव आहे. त्यांनी या खरेदीसाठी तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार केला होता.

या जमीन विक्री सबंधी एक ८० वर्षीय वृद्ध महिला आता कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. ही महिला वृद्ध असल्याने अन्य काहीजण या प्रकरणात गुंतले असावेत, असा संशय आहे. इडालीना डोरिस डीक्रूज़ असे या वृद्धेचे नाव असून, तिच्यावर मायणा कुडतरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३१८ (४) व ३१९ (२) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान हा व्यवहार फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण पुढील तपासासाठी तेथील पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली.

Goa Land Scam
Assagao Land Scam: SIT ने फास आवळला! आसगाव जमीन फसवणूक प्रकरणी 795 पानांचे आरोपपत्र सादर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेर्णा वीज खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी २२ ऑगस्ट रोजी या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसात तक्रार नोंद केली होती. लोटली येथील सर्व्हे क्रमांक १६३ / १ ही जमीन आयडीसीने वीज खात्याला ७ ऑक्टोबर २०१० साली अवार्ड म्हणून दिली होती.

Goa Land Scam
Margao Land Scam: मडगावात भूखंड देण्याच्या बहाण्याने 42.50 लाखांची फसवणूक; फातोर्डा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल

संशयिताला याबाबत पूर्ण माहिती होती. तरीही सासष्टी सब रजिस्ट्रार कार्यालयात आपल्या या जमिनीची मालकी असल्याचे भासवून त्यानी गिरीश कुमार पिल्लईकडे २.४०कोटींचे विक्रीपत्र केले, असा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी फातोर्डा पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता, आमच्याकडे ही फाईल अजूनही पोहोचली नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com