Forest Festival
Forest FestivalDainik Gomantak

Van Mahotsav : ... तरच वनमहोत्सवाचा हेतू सफल होईल- सुरेश खांडेपारकर

सुरेश खांडेपारकर : सरकारी प्राथमिक विद्यालय कणकिरे येथे वनमहोत्सव
Published on

Forest Festival : झाडे लावाच, पण त्यांची काळजीही घ्या, असे प्रतिपादन बोंडला अभयारण्याचे वनपाल सुरेश खांडेपारकर यांनी कणकिरे - सत्तरी येथे केले. सरकारी प्राथमिक विद्यालय कणकिरे आणि बोंडला अभयारण्य यांच्यातर्फे आयोजित वनमहोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर वनरक्षक रामनाथ म्हाळशेकर, गुळेलीचे सरपंच नीतेश गावडे, पालक - शिक्षक संघाच्या अध्यक्ष सुफला गावडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नूतन उमेश गावस उपस्थित होत्या.

खांडेपारकर पुढे म्हणाले, की जेवढी झाडे आपण लावतो त्याची योग्य काळजी घेतली तर निश्चितच वनमहोत्सव साजरा करण्याचा हेतू सफल होईल. मुलांमध्ये लहानपणापासून झाडांविषयी प्रेम निर्माण व्हावे म्हणून बोंडला अभयारण्य अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते.

Forest Festival
Goa G20 Summit : ‘इलेक्ट्रिफाय गोवा’ ईव्ही रॅलीचे 22 रोजी आयोजन

नूतन गावस म्हणाल्या, की झाडांमुळे आपण जिवंत आहोत. त्यासाठी आपल्याला जगण्यासाठी म्हणून तरी प्रत्येकाने दर पावसाळ्यात किमान एक तरी झाड लावावे. मुलांकडून झाडे लावून त्या त्या झाडांची काळजी संबंधित मुलाने घ्यावी.

सरपंच नीतेश गावडे व वनपाल सुरेश खांडेपारकर, नूतन गावस यांच्या हस्ते विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. मुख्य कार्यक्रमाची सुरवात तुळशीच्या झाडाला पाणी घालून करण्यात आली. एका विद्यार्थिनीने एकपात्री अभिनयाद्वारे झाडांचे महत्त्व कथन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com