Khandola : ''पुन्हा महामार्ग रोखायला भाग पाडू नका,'' कुंडईतील 'त्या' कामाबाबत ग्रामस्थांचा इशारा

कुंडईत समांतर रस्त्याचे काम संथगतीने; बॅरिकेडस्, पोलिससही गायब
Khandola Road
Khandola RoadDainik Gomnatak
Published on
Updated on

Khandola : फोंडा -पणजी महामार्गावरील मानसवाडा - कुंडई हे जंक्शन अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. फोंड्याहून पणजीच्या दिशेने मार्गक्रमण करताना मानसवाडा कुंडई येथील उतरणीवर वाहनाचा वेग वाढल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अनेक अपघाताच्या घटनांच्या नोंदी झाल्या आहेत.

त्यावर स्थानिकांनी आवाज उठविल्यानंतर उपाय म्हणून समांतर रस्त्याचे रूंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या रस्त्याचे काम कासवगतीने पुढे सरकत असल्यामुळे सरपंच सर्वेश गावडे यांच्यासह स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

वाहतूक पोलिस केवळ चलन फाडण्यासाठी तैनात केलेले आहेत. अपघात सत्राचे त्यांना कोणतेच सोयरसुतक नाही. धोकादायक उतरणीवरील सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या बॅरीकेडस् हटविल्या आहेत. यामुळे येथे पुन्हा अपघाताचा संभव असल्याची भीती स्थानिकांत आहे. अपघानानंतर घटनास्थळावर ठाण मांडून असलेल्या संतप्त कुंडईवासीयांनी सध्याचा मार्ग हा सर्व्हिस रोड म्हणून ठेवावा. तसेच पेट्रोलपंपजवळून काढलेला बगलमार्ग दुतर्फा अवजड

Khandola Road
Khandola News : तपोभूमीचे जनकल्याणार्थ व्यापक कार्य

वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली होती. 15 फेब्रुवारी रोजी मासळीवाहू कंटेनरने नाक्यावरील दुकानात घुसून तिथे ग्राहक म्हणून उभ्या असलेल्या युवकाचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आठ वाहनांच्या विचित्र अपघातानंतर आक्रमक ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालून निषेध तसेच महामार्ग 48 तासांसाठी रोखून धरला होता.या पार्श्‍वभूमीवर 23 मेपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले.

पुन्हा महामार्ग रोखण्याची वेळ येऊ नये!

वाढते अपघात लक्षात घेऊन संबंधित खात्याने या बायपास रस्त्याचे काम होती घेतले ते त्वरित पूर्ण करण्यासाठी धडपड करावी, अशी मागणी सरपंच सर्वेश गावडे यांनी केली आहे. रस्त्याचे काम संबंधित विभागाने व्यवस्थित करावे, या मागणीची पूर्तता न झाल्यास स्थानिकांवर पुन्हा एकदा आंदोलन करण्याची आणि महामार्ग रोखण्याची वेळ येईल. तशी वेळ आमच्यावर सरकारने आणू नये, असा इशारा कुंडईचे सरपंच सर्वेश गावडे यांनी दिला आहे.

Khandola Road
Khandola Temple Theft : खांडोळा देवस्थानमधील चोरीला सचिव व मामलेदार जबाबदार; भाविकांचा आरोप

सरकारला पडला आश्‍वासनांचा विसर

जेसीबीच्या सहाय्याने 24 मे रोजी रस्ता रुंदीकरणाचे सुरू झालेले काम आजपर्यंत संथगतीनेच सुरू आहे. या महामार्गवरून अवजड वाहनांची रेलचेल कायम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने दोन गुरे जखमी झाल्याची घटना घडली आहे. जेव्हा आंदोलन केले, त्यावेळेपुरत्या इथे बॅरिकेडस् घालून ठेवल्या होत्या. तसेच वाहतूक पोलिसाची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या सर्व गोष्टींचा विसर सरकारला पडलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com