Goa Tourism: कुळेत दूधसागर पर्यटन हंगामाला प्रा­­रंभ!

Goa Tourism: गोवा सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी या हंगामाचे उद्‌घाटन केले.
Ganesh Gaonkar | Goa Tourism
Ganesh Gaonkar | Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: कुळे दूधसागर पर्यटन हंगामाला वर्षपद्धतीप्रमाणे काल 2 ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्‍यक्ष तथा सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी या हंगामाचे उद्‌घाटन केले., काल हंगाम सुरू झाला तरी दूधसागर नदीच्‍या पात्रात खोल पाणी असल्‍यामुळे पर्यटकांना घेऊन जीपगाड्यांना जाता आले नाही.

यावेळी दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, दूधसागर ट्रिप असोसिएशनचे अध्यक्ष अशोक खांडेपारकर, दिलीप मायरेकर, अशोक गावकर, नंदीश नाईक देसाई, कुळे-शिगाव सरपंच गोविंद शिगावकर, उपसरपंच नेहा मडकईकर, पंचसदस्य बेनी आझावेदो, अनिकेत देसाई, साईश नाईक, प्रसाद गावकर, सदानंद बांदोडकर, आश्विनी नाईक देसाई, सोनम दहीफोडे, वन खात्याचे अधिकारी भावकर, कुळे पोलिस उपनिरीक्षक अजय धुरी आणि मान्यवर उपस्थित होते.

Ganesh Gaonkar | Goa Tourism
Miramar Beach: गांधी जयंतीला स्वच्छतेचा संदेश! वन खाते, सैन्यदलाकडून मिरामार बीचवर स्वच्छता

दरम्‍यान, दूधसागर भागात शनिवारी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता. त्‍यामुळे नदीच्‍या पात्रातील पाणी वाढले आहे. हे पाणी कमी होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. जेवढे दिवस पर्यटनाविना जातील, तेवढे दिवस जीप व्‍यावसायिकांना पर्यटन हंगामात वाढवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असेन, असे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी सांगितले.

कुळे येथील हा जगप्रसिद्ध धबधबा असल्‍याने येथे पर्यटक मोठ्या संख्‍येने येतात.त्यांना पुरेशा साधनसुविधा पुरविण्यात येतील, असेही तेंडुलकर म्‍हणाल्‍या. सचिव सत्यवान यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक गावकर यांनी आभार मानले. स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ganesh Gaonkar | Goa Tourism
Goa: 'काँग्रेसने 'मामीं'वर केला अन्याय'- प्रमोद सावंत

..तर जीपगाड्यांवर कारवाई

सरकारने दूधसागर ऑनलाईन नोंदणी करण्याचे निश्चित केले आहे. येत्या काही दिवसात ऑनलाईन नोंदणी झाली नाही तरी आम्ही ऑफलाईन व्यवसाय सुरू करणार असल्‍याचे दूधसागर ट्रिप असोसिएशनचे अध्यक्ष अशोक खांडेपारकर यांनी सांगितले. कुळे-शिगाव सरपंच गोविंद शिगावकर यांनी सांगितले की, पर्यटकांना देण्‍यात येणारे जॅकेट्‌स जीपगाड्यांनी पुन्‍हा पंचायतीकडे जमा करावयाच्‍या आहेत, अन्‍यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com