Mazi Bus Scheme: ‘माझी बस’ योजनेसाठी केवळ 70 खासगी बसेसची नोंदणी

या प्रकल्पाला खाजगी बस ऑपरेटर्सकडून आतापर्यंत फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही
Mazi Bus Scheme
Mazi Bus SchemeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Receiving 70 Applications Under Goa KTCL Mazi Bus Scheme: ‘माझी बस’ योजनेबाबत अनेक माध्यमांतून प्रसिद्धी होऊनही गेल्या दोन महिन्यांत दक्षिण गोव्यातील केवळ 70 खाजगी बसेसनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. मडगाव ते काणकोण आणि मडगाव ते कुडचडे हे मार्ग नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहेत.​

गोव्यातील दुर्गम भागात सार्वजनिक वाहतूक आणि बस कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या माझी बस योजनेच्या पथदर्शी प्रकल्पाला खाजगी बस ऑपरेटर्सकडून आतापर्यंत फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.

Mazi Bus Scheme
Illegal Sand Extraction: बाणस्तारी रेती छाप्याबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ!

खूप कमी खाजगी बसचालक पुढे आले आणि त्यांनी काही नफा कमावता यावा यासाठी या योजनेत नाव नोंदवले असल्याचे दिसून येत आहे.

कदंब महामंडळाचे ‘माझी बस’ योजनेचे प्रभारी विष्णू शेटगावकर यांनी सांगितले की, या योजनेत आतापर्यंत केवळ ७० खासगी बसचालकांनी नोंदणी केली आहे. या ७० बसेसमधून ५२ खाजगी बसेस मडगाव ते कुडचडे आणि मडगाव ते काणकोण या मार्गावर धावू लागल्या आहेत.

अधिकाधिक खाजगी बस ऑपरेटरची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत आम्हाला उत्तर गोव्यातून खाजगी बस ऑपरेटरचा एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. तरीही आम्ही आशावादी आहोत, असेही शेटगावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Victim Compensation Scheme
Goa Mazi Bus Scheme Latest Update
Goa Ujjwala Scheme Latest Update
Goa Local Jobs In Industrial Estates
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com