Sankalp Amonkar
Sankalp AmonkarDainik Gomantak

MLA Sankalp Amonkar: समाज बांधणीसाठी एकत्रित काम करणे गरजेचे

गोवा क्षत्रिय मराठा खारवी समाजातर्फे 2022 च्या शिष्यवृत्या प्रदान

वास्को: समाज बांधणीसाठी समाज बांधवांनी एकत्रित येऊन कार्य करण्याचे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे समाजाला बळकटी मिळेल. तसेच समाजातर्फे समाजपयोगी कार्यक्रम घडवून समाजातील गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यास सदैव तत्पर्य राहावे असे आवाहन मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केले.

(Goa Kshatriya Maratha Kharvi Samaj awarded scholarships to 10th and 12th students by MLA Sankalp Amonkar)

Sankalp Amonkar
Goa Crime : मनोज यादव खूनप्रकरणी तिघे संशयित दोषमुक्त

गोवा क्षत्रिय मराठा खारवी समाजातर्फे 2022 च्या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या प्रदान करण्यात आल्या. रवींद्र भवन बायणा येथे आयोजित या शिष्यवृत्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. तसेच विशेष अतिथी म्हणून नगरसेवक तथा समाज कार्यकर्ते सुदेश भोसले उपस्थित होते.

यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर नगरसेवक विनोद किनळेकर, समाजाचे अध्यक्ष वासुदेव साळगांवकर, सचिव सतीश वळवईकर,चंद्रकांत गिरप, महिला अध्यक्षा अक्षदा वाडेकर, महिला सरचिटणीस वैशाली आमोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Sankalp Amonkar
'ते' राष्ट्रीय ध्वज तात्काळ उतरवा - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

यावेळी पुढे बोलताना आमदार आमोणकर म्हणाले कि, गोवा क्षत्रिय मराठा खारवी समाजाच्या मुरगाव शाखेचे शिष्यवृत्ती कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुकास पात्र आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

विशेष अतिथी सुदेश भोसले यांनी समाजातील लोकांना एकत्र राहण्याचे आवाहन केले आणि समाजातील लोकांचे पाय ओढण्यात कधीही गुंतू नका. "सर्व क्षेत्रात एकजुटीने उभे राहिल्यास आपण अव्वल स्थानावर राहू शकतो,' असेही त्यांनी सांगितले. त्यांनी समाजातील ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद मागितले.

शिष्यवृत्ती सोहळ्यात यंदा रिया चोडणकर, रुद्राक्ष वाडेकर, यश धावडे, प्रणव चोडणकर, रोहन चोडणकर, दष्ती फडते, दक्ष आमोणकर, हिमेश धावडे,रमेश फडते, पांडुरंग गिरप, कांता तारी, वासू आमोणकर, सतीश वळवईकर यांनी पुरस्कृत केल्या होत्या.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक वासुदेव साळगावकर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन वैशाली आमोणकर यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com