Goa: खोर्जुवे केबल स्टेड पुलामुळे बदलला हळदोणेचा चेहरामोहरा!

Goa: शहरीकरण झाले तरीही भौतिक, सामाजिक वातावरण निकोप; केबल स्‍टेड पूल आकर्षण
Bridge
BridgeDainik Gomantak

जगातील सर्वांत सुंदर गावांच्या यादीत हळदोणा गावाचा समावेश होतो. म्हापसा नदीच्या काठावर वसलेल्या व म्हापसा शहरापासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर हे निसर्गसंपन्न गाव वसले आहे. मागील तीन दशकांत या गावाच्या विकासासोबतच लोकांचे राहणीमान बदलले असले तरी, येथील हिरवळ व नैसर्गिक सौंदर्यच हे हळदोणा गावाचे वेगळेपण असून जे आजतागायत येथील स्थानिकांनी जपले आहे. गावाचा खरा विकास हा हळदोणा-खोर्जुवे केबल स्टेड पुलामुळे झाला.

Bridge
Goa : ‘त्या’ दोन हत्तींची गुजरातला रवानगी होणार

2004 मध्ये केबल पुल (Bridge) खुला करण्यात आला होता. तेव्हापासून गावाने किंवा येथील स्थानिकांना पुन्हा मागे वळून पाहिले नाही. हा केबल पूल बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत दाखविला असून, तो ओलांडून खोर्जुवे किल्यावर जाता येते. गावाच्या प्रवेशद्वाराच्या चौकातच एडवर्ड जे सोरेस यांचा पुतळा आहे. त्यांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध बंड केले होते. त्‍यांनी 25व्या वर्षी हळदोणा गावात 1923 मध्ये सेंट थॉमस हायस्कूलची सुरूवात केली. त्यांचा हा पुतळा गावात 2006 मध्ये उभारण्यात आला. तसेच सेंट थॉमस चर्च गावाच्या सौंदर्यात त्‍यामुळे भर पाडते.1596 मध्ये या चर्चची उभारणी झाली.

तसेच कालवी पुलाची निर्मिती गावाच्या विकासाला हातभार लावते. या पुलाच्या बांधकामामुळे विशेषतः पावसाळ्यात नदी (River)ओलांडताना लोकांना होणारात्रास कमी झाला. जुन्या दिवसांत, हे गाव एक व्यस्त व्यापार क्षेत्र म्हणून ओळखले जायचे. कालवीसह हळदोणा गाव हा कांदे आणि मिरच्यांसाठी प्रसिद्ध होते. या ठिकाणांहून आलेली कांद्याची रोपी तिसवाडीतील आगशीसह गोव्यातील इतर गावांमध्ये नेल्याचे स्थानिक सांगतात.

Bridge
Goa Government : ‘ऑन ड्युटी’ मृत्यू झाल्यास वारसदारांना तत्काळ नोकरी

* होडीची जागा घेतली फेरीबोटीने

पूर्वी गावाबाहेर पडणे म्हणजे होडीचा वापर केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रात्री-अपरात्री कधीही होडीवाल्यांना हाक मारली तर ते लोकांच्या सेवेला उपलब्ध असायचे. होडीवाल्याला पैसे हळदोणा कोमुनिदादकडून दिले जायचे. त्यामुळे लोकांसाठी ही मोफत सुविधा होती. होडीला वेळेचे बंधन नसायचे. पावसाळ्यात मात्र अनेकवेळा होड्यांची वाहतूक बंद असायची. अशावेळी लोकांना तीन-तीन दिवस गावातच थांबून राहावे लागायचे. कालांतराने होडीची जागा फेरीबोटीने घेतली. पण फेरीलाही वेळेचे बंधन असल्याने अनेकदा गैरसोय होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com