गावातील मुख्य मंदिरासमोरच्या तलावावरुन गावाचे नाव पडले 'केरी', असा आहे या गावचा इतिहास...वाचा..

Keri- village in Goa: केरी हे ग्रामनाम कन्नड शब्द 'केरि'शी संबंधित असून, 'केरि'चा अर्थ होतो पाण्याचे तळे अथवा जलाशय
Village in Goa
Village in GoaDainik Gomantak

Keri village in Goa: गोव्यातील प्रत्येक गावातील भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. इथे मिळणाऱ्या वनस्पती, वन्यजीव, गावातील ऐतिहासिक- धार्मिक वास्तू या सगळ्या गोष्टींमुळे गोव्यातील या छोट्या गावांची ओळख दूरवर झालीय. 

आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या पर्वतरांगांच्या साखळीत वसलेला निसर्गसंपन्न गाव म्हणजे केरी. सत्तरीतील पर्ये मतदारसंघात सुर्लपाठोपाठ भौगोलिक आकाराने दुसरा मोठा गाव. 1214 हेक्टर क्षेत्रफळात विखुरलेल्या गावात एके काळी मोठ्या प्रमाणात जंगलक्षेत्र होते. आज त्याचे प्रमाण घटत आले आहे.

गावच्या सीमा:-

घोटेली, शिरोली, हणजुणे, गुळ्ळे, झर्मे, सालेली आणि मोर्ले या गावांनी वेढलेल्या केरी गावांपासून महाराष्ट्राची सीमा काही अंतरावर वसलेली आहे. चोर्ले घाट मार्गाच्या पायथ्याशीही हा गाव बसलेला असल्याने पूर्वीच्या काळी या गावाला व्यापार, उद्योगांच्या दृष्टीने विशेष महत्त्व होते.

Village in Goa
Goa Molestation Case: बार्देशमध्ये महिलेचा विनयभंग करणारा गजाआड; न्यायालयाने सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी

इतिहासात डोकावताना:-

ब्रिटिश अमदानीत पोर्तुगीजांच्या ताब्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपासून काही अंतरावर केरी गाव वसलेला असल्याने संरक्षण दृष्टीने आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्तीसाठीलढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या हालचाली नियंत्रित करण्यासाठी येथे पोलिस ठाणे होते.

सध्याच्या सातेरी केळबायच्या मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या एका टेकडीवर तटबंदी असलेला प्रशस्त वाडा होता. आज उपेक्षेमुळे या वाड्याचे केवळ भग्नावशेष तेवढेच शिल्लक आहेत.

शस्त्रसज्ज राण्यांचा त्या काळी बराच दबदबा होता आणि त्यासाठी जेव्हा टिपू सुलतानने सड्याचा किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला तेव्हा सडेकर देसाई संरक्षणासाठी चोर्ला घाटातून केरीला राण्यांकडे आश्रयाला आले.

26 जानेवारी 1852 मध्ये नाणसाचा किल्ला जिंकून पोर्तुगीज सत्तेला कडवे आव्हान देणारे दिपाजी राणे हे केरीच्या राणे घराण्याशी निगडीत होते.

केरीतील सातेरी केळबाय मंदिराच्या परिसरात आढळलेल्या सप्तमातृका आणि गुळ्ळे येथील कदंब राजचिन्हांनी अलंकृत असलेल्या गजलक्ष्मी यावरून शिवचित्त पेरमाडीदेव राजाच्या काळात केरी हा गजबजलेला गाव असला पाहिजे.

ग्रामनामाबद्दल थोडी माहिती:-

केरी हे ग्रामनाम कन्नड शब्द 'केरि'शी संबंधित असून, 'केरि'चा अर्थ होतो पाण्याचे तळे अथवा जलाशय आणि आज गावातील मुख्य मंदिरासमोर असलेला तलाव या गावाच्या नावाची प्रचिती आणून देतो.

कसे जाल?

राजधानी पणजीपासून केरी गाव 50- 52 km अंतरावर उत्तर गोव्यात वसले असून पणजी तसेच म्हापसा येथून खासगी बस तसेच कदंब ट्रान्सपोर्ट बसने तुम्ही या गावात जाऊ शकता. तसेच तुम्ही तुमची स्वतःची कार घेऊन या सफारीचा आनंद घेऊ शकता.

(सदर माहिती ही गोव्यातील विविध क्षेत्रातील अभ्यासकांशी आणि मान्यवरांशी संवाद साधून, वेगवेगळे संदर्भ घेऊन संकलित केली असून यातून गोव्याचे सकारात्मक आणि आदर्श चित्र उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com