Terekhol River: बुधवारी सायंकाळी उत्तर गोव्यातील केरी तेरेखोल खाडी किनारी मोठ्या संख्येने बॉबी तारले मासे लागल्याने मत्स्यप्रेमींसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल साईटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
दरम्यान या घटनेसंबंधी गोमंतकने मच्छिमारांशी संवाद साधला असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की, ही एक नैसर्गिक घटना आहे. तेरेखोल खाडीत हे बॉबी तारले मासे चंद्र प्रकाशाच्या वलयामुळे आले असतील.
बुधवारी पौर्णिमा असल्याने समुद्राला थोडी भरती देखील होती. या उधाणामुळे आणि निखळ चंद्रप्रकाशामुळे मासे किनाऱ्यावर येऊ शकतात.
तसेच प्लवंग तयार झाल्यावर देखील त्याच्या ओघाने मासे किनारी लागण्याची घटना घडू शकते अशी माहिती देखील मच्छीमारांकडून मिळाली. घटनेची सत्यता समोर येण्याअगोदर काहीजणांकडून याविषयी ही घटना म्हणजे पर्यावरणीय बदलाचे संकेत असल्याचे बोलले जात होते.
तर काहींच्यामते समुद्रातील प्रदूषणामुळे अशा घटना घडत आहेत. मात्र मच्छीमारांकडून या घटनेविषयी सावितर माहिती समोर आल्यावर किनाऱ्याला लागलेले बॉबी तारले सारखे चंदेरी लकलकणारे चविष्ट मासे पकडण्यासाठी अस्सल मासेखाऊंनी तिथे गर्दी केली हे वेगळं सांगायला नकोच.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.