आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) विमानतळावरून बाहेर आले. हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले, सरळ गाडीत जाऊन बसले व गेले. यामुळे सुमारे अडीच तास पावसाची तमा न बाळगता तसेच तहान भूक विसरून त्यांच्या आगमनाच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले कार्यकर्ते नाराज होऊन माघारी परतले.
गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) च्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आज गोव्यात दाबोळी विमानतळावर दुपारी तीन वाजता आगमन झाले. गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचा झेंडा फडकवण्याचा मनोदय आम आदमी पक्षाने बाळगला असून राष्ट्रीय नेत्यांनी गोवा भेट ही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी फलदायी ठरणार यांची जाणीव ठेवून हे नेते मंडळी सध्या गोव्यात येऊन आपले जाळे सर्वत्र विणत आहे.त्यानुसार त्यांची गोवा वारी सुरू आहे. तर आज खुद्द आपचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः गोव्यात आले असून ते गोव्यासाठी कोणती योजना जाहीर करणार यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या ते पत्रकार परिषदेतून गोव्यातील जनतेला संबोधित करणार आहे.
दरम्यान आज केजरीवाल यांचे गोव्यात आगमन होणार यासाठी आपच्या कार्यकर्त्यांनी दाबोळी विमानतळावर मोठ्या संख्येने हातात आपचा झेंडा घेऊन गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतराचा फडशा पाडलेला दिसला. तरी पण पोलिसांनी त्यांना एकाच ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला देऊन त्यांना एकाच ठिकाणी राहण्यास मज्जाव केला. तेव्हा ते दोन चार गट करून उभे राहिले होते. दुपारी अडीच वाजता केजरीवाल यांच्या आगमनाची वेळ होती. त्यानुसार आपच्या कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजल्यापासून विमानतळावर गर्दी करून आपल्या राष्ट्रीय नेत्याची वाट बघत उभे होते. यात आप'च्या प्रवक्त्या प्रतिमा कुतिन्हो तसेच राहुल म्हांबरे, मुख्य प्रवक्ता वाल्मिकी नायक, संदेश तेलेकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान आपचे मुख्य कार्यकर्ते, केजरीवाल यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. केजरीवाल विमानतळावरून तीन वाजता बाहेर आले. यावेळी कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा दिल्या. त्यांना हात उंचावून केजरीवाल यांनी अभिवादन केले व ते पोलीस पहाऱ्यात गाडीत जाऊन बसले.यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला.मात्र केजरीवाल यांनी टाळले व नमस्कार करून ते गेले. यामुळे अडीच तास आपल्या लाडक्या नेत्याची वाट बघत असलेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. त्यामुळे ते हीरमूसले होऊन परतले. प्रमुख कार्यकर्त्यांच्या हातातील पुष्पगुच्छ तसेच होते. यावेळी केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद करण्यात आले नसल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.