'कदंब'च्या दहा वर्षे जुन्या बसेसमध्ये सीएनजी इंजिन! 70 चार्जिंग स्टेशन्स उभारणार- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa Kadamba buses CNG conversion: कदंब परिवहन महामंडळाच्या सुमारे १० वर्षे जुन्या डिझेल बसेसमध्ये सीएनजी इंजिन बसविण्यात येतील.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कदंब परिवहन महामंडळाच्या सुमारे १० वर्षे जुन्या डिझेल बसेसमध्ये सीएनजी इंजिन बसविण्यात येतील. तसेच ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेअंतर्गत गोव्यात ७० नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोव्यासाठी इंधन व्यवस्थापन आणि शाश्वत परिवहन धोरणाबाबत मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल सायंकाळी आल्तिनो येथील महालक्ष्मी बंगल्यावर बैठक झाली. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिकाधिक करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीस डीएनआरई (नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभाग), परिवहन विभाग, कदंब परिवहन महामंडळ व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

CM Pramod Sawant
Goa Heavy Rain: पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला, पण सत्तरीत ढगफुटीसदृश पावसामुळे रस्ते जलमय, जनजीवन ठप्प

यावेळी पारंपरिक पेट्रोल वाहनांकडून इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारा प्रवास गतिमान करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी डीएनआरई विभागाला सर्वसमावेशक योजना तयार करण्याचे निर्देश दिले.

या योजनेंतर्गत सध्या परवानाधारक असलेल्या ‘मोटारसायकल पायलट’ (मोटारसायकल टॅक्सीचालक) आणि ऑटो-रिक्षाचालकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com