Independence Day: गोव्यात तिरंगा फडकवण्यास विरोध; नौदलाला रद्द करावा लागला कार्यक्रम

स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव (Independence Day 2021) सुरू होण्यापूर्वी गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
IndiaNational flag
IndiaNational flagDainik Gomantak

पणजी: स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव (Independence Day 2021) सुरू होण्यापूर्वी गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याच्या साओ जॅसिंटो (Jacinto island) बेटावरील रहिवाशांनी नौदलाला तेथे ध्वजारोहण (national flag) करण्यात आणि स्वातंत्र्योत्सव साजरा करण्यास आक्षेप घेतला आहे. यानंतर, गोवा नौदल क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी तेथे कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला. (Indian Navy prevented from hoisting national flag in Goa)

15 ऑगस्टचा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. नौदलाने 'आझादी के अमृत महोत्सव' च्या निमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरातील बेटांवर तिरंगा फडकवण्याची योजना आखली आहे. पण गोव्याच्या साओ जॅसिंटो बेटावरील कार्यक्रम रद्द करावा लागला.

गोव्याच्या बेटावर तिरंगा फडकू न दिल्याबद्दल लोकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देशात तिरंगा फडकवला पाहिजे, कोणालाही निषेध करण्याचा अधिकार नाही, अशा कमेंट युजर्स करत आहेत.

दक्षिण गोव्यातील साओ जॅसिंटो बेटावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा कार्यक्रम काल नौदलाने रद्द केला. आज सकाळी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Dr. Pramod Sawant) यांनी ट्विटरवर आपली नारीजी व्यक्त केली आहे, "हे दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे की सेंट जॅकिंटो बेटावरील काही व्यक्तींनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय नौदलाकडून राष्ट्रध्वज फडकवण्यावर आक्षेप घेतला आहे. मी याचा निषेध करतो आणि रेकॉर्डवर सांगू इच्छितो की माझे सरकार असे कृत्य सहन करणार नाही, नेहमीच राष्ट्र प्रथम स्थानावर असेल. भारतीय नौदलाला त्यांच्या मूळ योजनेसह पुढे जाण्याची विनंती केली होती आणि गोवा पोलिसांकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले होते," असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

काल संध्याकाळी गोव्यातील Jacinto Island बेटावर ही घटना घडली आहे. तिरंगा फडकवण्याच्या कार्यकमाचा भारतीय नौदलाचा सराव सुरू होता. तेव्हा काही लोकांनी त्यांच्या राष्ट्रध्वज फडकवण्यावर आक्षेप घेतला. तेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नाराजी व्यक्त करत गोवा पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com