Goa Job Fraud: न्यूझीलंडमध्ये नोकरी देण्याचं आमिष, त्वचारोग तज्ञ महिलेने 13 गोमंतकीयांना घातला 27.73 लाखांचा गंडा

Fake Job Offer Scam Goa: न्यूझीलंडमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून 13 गोमंतकीयांना 27.73 लाखांचा गंडा घातल्याच्या बातमीने गोव्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.
Goa Job Fraud: न्यूझीलंडमध्ये नोकरी देण्याचं आमिष, त्वचारोग तज्ञ महिलेने 13 गोमंतकीयांना घातला 27.73 लाखांचा गंडा
Goa Job FraudDainik Gomantak
Published on
Updated on

Fake Job Offer Scam Goa: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने फसवणूकीच्या घटना समोर येत आहेत. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालण्यात आला. यातच आता आणखी एक फसवणकीचे प्रकरण समोर आले आहे. न्यूझीलंडमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून 13 गोमंतकीयांना 27.73 लाखांचा गंडा घातल्याच्या बातमीने गोव्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. राज्यात कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन आधीच सावळा गोंधळ निर्माण झाला असतानाच ही घटना समोर आली आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक जणाच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

नेमक प्रकरण काय?

न्यूझीलंडमध्ये (New Zealand) चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष 13 गोमंतकीयांना दाखवण्यात आले. दोन्ही आरोपींनी आपण रिक्रूटिंग एजंट असल्याचे या पीडितांना सांगितले होते. त्यांनी पहिल्यांदा नोकरी देण्याच्या पूर्वी प्रोसेसिंग फी म्हणून वेगवेगळ्या व्यवहारांमधून 8,50, 000 उकळले. नंतर 27,73,540 रुपयांची मागणी आरोपींनी पीडितांकडे केली. एवढचं नाहीतर आरोपींनी पीडितांची व्हिसासह आवश्यक कागदपत्रेही तयार करुन घेतली होती. मात्र तक्रारदाराला जेव्हा आपली फसवणूक झाली असल्याचे समजले तेव्हा त्याने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्याने पोलिसांना फसवणूकीचा सगळा घटनाक्रम सांगितला. तक्रारदार आणि इतर 12 जणांना भरती एजंट असल्याचे सांगत आरोपींनी लाखोंचा गंडा घातला.

Goa Job Fraud: न्यूझीलंडमध्ये नोकरी देण्याचं आमिष, त्वचारोग तज्ञ महिलेने 13 गोमंतकीयांना घातला 27.73 लाखांचा गंडा
Goa Job Fraud: गोव्‍यातील बेकार युवकांना लुटणाऱ्या ठकसेन दाम्‍पत्‍यावर गुन्‍हा नोंद; विदेशात नोकरीच्या नावाने 10 कोटींचा गंडा

त्वचारोग तज्ञ महिलेस अटक

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या (Goa Police) गुन्हे शाखेने महिला त्वचारोग तज्ञ मीना गोप हिला अटक केली असून तिच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरु आहे. बीएनएस कलम 318, 336 आर डब्ल्यू 3 (5) आणि इमिग्रेशन अॅक्ट 1983 कलम 10 अंतर्गत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास डीवायएसपी क्राइम राजेश कुमार आणि एसपी राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली पीआय प्रशल देसाई यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com