Goa Job Fraud: गोव्‍यातील बेकार युवकांना लुटणाऱ्या ठकसेन दाम्‍पत्‍यावर गुन्‍हा नोंद; विदेशात नोकरीच्या नावाने 10 कोटींचा गंडा

Goa Crime: विदेशात नोकरी देण्‍याचे आश्‍‍वासन देऊन गोव्‍यातील बेकार युवकांना कोट्यवधी रुपयांना लुटण्‍याचा आरोप असलेल्‍या ठकसेन दाम्‍पत्‍यावर फसवणुकीच्‍या आरोपाखाली गुन्‍हा नोंद केला.
Cash For Job Scam, America Job Scam
Cash For Job ScamDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

US Cash For Job Scam

मडगाव: विदेशात नोकरी देण्‍याचे आश्‍‍वासन देऊन गोव्‍यातील बेकार युवकांना कोट्यवधी रुपयांना लुटण्‍याचा आरोप असलेल्‍या बाला नंदेश्‍‍वर राव आणि शांती बाला राव या दोघांनी मायणा-कुडतरी येथील अरबाज खान या युवकाला अमेरिकेत नोकरी देण्‍याचे आमिष दाखवून साडेआठ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणात मडगाव पोलिसांनी या ठकसेन दाम्‍पत्‍यावर फसवणुकीच्‍या आरोपाखाली आज गुन्‍हा नोंद केला.

मूळ आंध्र प्रदेशातील राव दाम्‍पत्‍याने मडगावात रिक्रूटमेंट केंद्राच्‍या नावे आके येथील विशाल मेगा मार्टजवळ कार्यालय थाटले होते. माल्‍टा आणि अमेरिका येथे नोकरी देण्‍याचे आश्‍‍वासन देऊन त्‍यांनी शेकडो युवकांना आकर्षित केले. त्‍यांनी बेकार युवकांना घातलेला गंडा दहा कोटींच्‍या आसपास असून सध्‍या हे दाम्‍पत्‍य गोव्‍यातून फरार झाले आहे.

Cash For Job Scam, America Job Scam
Tanvi Vasta Case: 'तन्‍वी' प्रकरणात 'काही' बिल्‍डरही गाेत्‍यात येण्‍याची शक्‍यता! 'नेट बँकिंग'ची माहिती नसलेले अनेकजण झाले शिकार

साडेआठ लाख घेऊनही नोकरी नाही!

आज तक्रार दिलेल्‍या अरबाज याच्‍याकडून या दाम्‍पत्‍याने साडेआठ लाख रुपये घेतले होते. पण शेवटपर्यंत त्‍याला नोकरी मिळाली नाही. या बोगस रिक्रूटमेंट एजन्‍सीचे कार्यालय बंद झाल्‍याने आपण फसलो गेलो आहोत, याची जाणीव झाल्‍यामुळे अरबाजने पोलिसांत तक्रार दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Viral Post
Gomantak TV Engineers Excellence Awards
1.5 crore salary job viral story
Goa Government Job Opportunities
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com