GMC Infertility Center: स्त्री-पुरुष वंध्यत्वावर मोफत उपचार देणारे गोवा पहिले राज्य...

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात व्यंधत्व निवारण उपचार मोफत करणे सुरू झाले.
GMC Infertility Center:
GMC Infertility Center:Dainik Gomantrak
Published on
Updated on

GMC Infertility Center: गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात व्यंधत्व निवारण उपचार मोफत करणे सुरू झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे उपचार करण्यासाठी सुरू केलेल्या खास विभागाचे उद्‍घाटन करण्यात आले.

GMC Infertility Center:
Illegal slums : ऐन पावसाळ्यात झोपड्या जळाल्या; मजुरांची अवस्था ‘ना घर का,ना घाटका’; कळंगुटचे सरपंच म्हणतात...

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध उपचार पद्धती राज्यात सुरु करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.दरम्यान, देशात सरकारी इस्पितळात वंध्यत्व निवारण उपचार सुविधा देणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे,असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, खासदार सदानंद शेट तानावडे, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आदी मंचावर होते. मुख्यमंत्र्यांनी रिमोटचे बटण दाबून या उपचार पद्धतीच्या विभागाचे उद्‍घाटन केले.

GMC Infertility Center:
Goa Death Case: केळशीतील आढळला नदीत मृतदेह

मूल हवे यासाठी उपचारासाठी दांपत्ये पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी जातात. राज्यातच अशी उपचार सुविधा हवी अशी गरज त्यातून ठळक झाली. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीखाली इस्पितळाला दोन कोटींची आर्थिक मदत मिळाली. त्यातून या उपचारासाठी लागणारी उपकरणे आणि यंत्रे विकत घेण्यात आली. या उपचार पद्धतीत डॉ. केदार पडते यांचे योगदान असेल, त्यामुळे हे उपचार सर्वोत्कृष्टच असतील.

-विश्‍वजित राणे, आरोग्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Iran Shopping Center Fire Video
goa crime branch busts two fake call centers
BVSc and AH Degree Course Goa
Saligao Police Raid
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com