गोवा आयआरबी पोलिसांना मिळणार मतदानाचा हक्क

निवडणुकीसाठी बदली गोवा पोलिस आज होणार उत्तरप्रदेशला रवाना
Goa IRB Police
Goa IRB PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर प्रदेशात निवडणूक ड्युटीवर गेलेले व टपाल मतदानापासून वंचित असलेल्‍या सुमारे 500 गोवा आयआरबी पोलिसांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज्‍यात बोलाविण्यात येणार आहे. त्यांच्या जागी उद्या 1 मार्चला संध्याकाळी तेवढेच पोलिस उत्तप्रदेशला रवाना होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक गैरव्यवस्थापनावर टीका झाल्याने गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Goa IRB Police
‘एमपीएचडब्ल्यू’ भरतीला आव्हान; आणखी एक याचिका दाखल

येत्या 10 मार्चला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. टपाल मतदान करण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत आहे. राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान झाले. त्याच दिवशी सुमारे 900 आयआरबी पोलिसांना उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक सुरक्षा व्यवस्थेसाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळे अनेकांना त्यांच्या घरच्या पत्त्यावर पोचलेल्या टपाल मतांचे मतदान करता आले नाही. त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला गेला असल्याचे तसेच त्यांना मतदानाची संधी दिली गेली नसल्याची टीका सर्व स्तरातून झाल्यावर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Goa IRB Police
15 दिवसांत रस्‍ते दुरुस्‍त करा, अन्‍यथा आंदोलन: काँग्रेस नेते

रेल्‍वेचा नकार, कदंब बसेसने प्रवास

उत्तर प्रदेशमध्ये आयआरबी पोलिसांच्या जागी गोव्यातील पोलिसांना पाठविण्यासाठी रेल्वेने व्यवस्था करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सरकारवर कदंब बसगाड्यांनी या पोलिसांना पाठविण्याची वेळ आली आहे. विविध पोलिस स्थानकांतील व विविध विभागांतील पोलिसांना आज दुपारी बिनतारी संदेश पाठवून त्वरित गोवा राखीव पोलिस दलाच्या कार्यालयात हजर राहण्याचे फर्मान सोडण्‍यात आले. मात्र काहीजण रात्रपाळी करून घरी परतले होते, त्यांना या कमी वेळेत सर्व तयारीनिशी उपस्थित राहणे शक्य न झाल्याने त्यांना उद्या पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com