15 दिवसांत रस्‍ते दुरुस्‍त करा, अन्‍यथा आंदोलन: काँग्रेस नेते

युवक काँग्रेसचा इशारा: आल्‍तिनो-पणजी येथे साबांखाच्‍या मुख्य अभियंत्‍यांना घेराव
Congress leader warn Repair roads in 15 days
Congress leader warn Repair roads in 15 days Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: युवा काँग्रेसच्या नेत्यांनी आज सोमवारी आल्तिनो येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गुप्ता यांना घेराव घालून राज्यातील खराब रस्त्यांसंदर्भात प्रश्नांचा भडिमार केला. भाजपचे राष्ट्रीय नेते गोव्यात येतात तेव्हा डांबरीकरणाचे साहित्य कसे उपलब्ध होते आणि ते जिथे जाणार तेवढेच रस्ते कसे दुरुस्त केले जातात, असा प्रश्न त्‍यांनी उपस्‍थित केला. येत्या पंधरा दिवसांत सर्व रस्त्यांचे काम पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्‍यांनी दिला.

Congress leader warn Repair roads in 15 days
पाण्यासाठी धावाधाव, अनियमित पुरवठ्याच्या नळावरच शिवोलीकरांची भिस्त

यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, अर्चित नाईक, उत्तर गोवा अध्यक्ष विवेक डिसिल्वा, पणजीचे अध्यक्ष व्यास चोडणेकर, मीडिया प्रभारी हिमांशू तिवरेकर, नौशाद चौधरी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. युवक काँग्रेसच्या वतीने रस्ते दुरूस्ती आणि चुका करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे निवेदनही देण्‍यात आले. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी कित्येक तारखा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी 3 ऑक्टोबर 2021 रोजी आश्वासन दिले होते की 1 नोव्हेंबर 2021 पासून गोव्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. पण तसे झाले नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

Congress leader warn Repair roads in 15 days
‘लिंक रोड’ चे काम पूर्ण करण्‍यासाठी पोलिसी बळाचा वापर

जनार्दन भंडारी म्हणाले की, येत्या पंधरा दिवसांत गोव्यातील रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे. हॉटमिक्ससाठी साहित्य उपलब्ध नाही ही सबब आम्ही खपवून घेणार नाही. साहित्याची कमतरता असल्यास तुम्ही पंतप्रधान किंवा केंद्रीय महामार्ग मंत्री यांच्याशी संपर्क साधा व काम पूर्ण करून घ्‍या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com