IDC Goa: 'आयडीसी'च्या 30 प्लॉट्ससाठी केवळ 10 जणांकडूनच बोली!

IDC Goa: प्लॉट्सची लिलाव प्रक्रिया यावेळी अगदी सोपी करण्यात आली आहे.
IDC Goa
IDC GoaDainik Gomantak

IDC Goa: गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या (आयडीसी) 30 प्लॉट्ससाठी केवळ 10 जणांकडून बोली लावण्यात आली आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत ही जास्त असली, तरी यंदा आणखी वाढ होणे अपेक्षा होते. परंतु परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली असून महामंडळावरील कर्ज फेडल्यानंतर आयडीसीमध्ये साधनसुविधा निर्माण केली जाईल, अशी माहिती गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ॲलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिली. पर्वरी येथील विधानसभा संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते.

प्लॉट्सची लिलाव प्रक्रिया यावेळी अगदी सोपी करण्यात आली होती. त्यामुळे चांगला प्रतिसाद अपेक्षित होता, परंतु तसे काही झाले नाही. गेल्या वेळी 7 जणांनी बोली लावली होती, यंदा हा आकडा वाढून 10 झाला आहे. भविष्यात उत्तम दर्जाची साधन सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

IDC Goa
Mopa Airport: नामकरणाचा विषय 'खरी कुजबूज'

महामंडळावर 50 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांपैकी 25 कोटी रुपयांची परतफेड करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात आणखी 17 ते 18 कोटी रुपयांची परतफेड करण्याचा प्रयत्न केला जाईल. कर्ज लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदा कर्ज फेडल्यानंतर साधन सुविधा करण्यावर भर दिला जाईल, असे रेजिनाल्ड यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी महामंडळाशी निगडित समस्यांसंदर्भात चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. महामंडळातील सर्व गोष्टींची नीट घडी बसवण्यासाठी काम सुरू आहे. येणाऱ्या काळात सर्वकाही सुरळीत होऊन पुन्हा एकदा आयडीसी शिखर गाठणार आहे, असे रेजिनाल्ड म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com