GIDC Award: गोवा 'आयडीसी'चा सन्मान! ‘गव्हर्नन्स नाऊ वेस्ट टेक ॲवॉर्ड’ प्रदान; चेअरमन रेजिनाल्ड यांना सीएमडी लीडरशीप

Governance Now West Tech Award: गोवा औद्योगिक विकास महामंडळाला प्रतिष्ठेच्या ‘गव्हर्नन्स नाऊ वेस्ट टेक सिम्पोझियम आणि ॲवॉर्डस २०२५’मध्ये सन्मानित करण्यात आले.
Aleixo Reginaldo, Governance Now West Tech Award GIDC
Aleixo Reginaldo, Governance Now West Tech Award GIDCDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा औद्योगिक विकास महामंडळाला प्रतिष्ठेच्या ‘गव्हर्नन्स नाऊ वेस्ट टेक सिम्पोझियम आणि ॲवॉर्डस २०२५’मध्ये सन्मानित करण्यात आले. आयडीसीचे चेअरमन आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना सीएमडी लीडरशीप ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला.

अनुकरणीय नेतृत्व आणि आयडीसीमधील प्रशासन आणि तांत्रिक सुधारणांमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लॉरेन्स यांच्या नेतृत्वाखाली आयडीसीने प्रगतशील औद्योगिक धोरण, व्यवसाय सुलभतेसाठी विविध मान्यता प्रक्रियांचे सुलभीकरण करणे आणि शाश्वत औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण निर्मिती केली आहे.

औद्योगिक क्षेत्रातील प्रशासनात नवोपक्रम, कार्यक्षमता विकास आणि उत्कृष्टतेसाठी महामंडळाच्या समर्पण या बाबींवर या पुरस्काराच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे.

Aleixo Reginaldo, Governance Now West Tech Award GIDC
GIDC Fund: औद्योगिक वसाहतींसाठी मोठी घोषणा! महामंडळाकडून 100 कोटी मंजूर; रस्ते, जलपुरवठा विकासावर भर

आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले की, ‘गोवा-आयडीसीने कमी वेळेत कर्जमुक्त महामंडळ बनून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. या यशामुळे आम्हाला गोव्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासात १०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यास सक्षम केले.

शिवाय, महामंडळाने सादर केलेले ‘ओपन पोर्टल’ हे अशा प्रकारातील पहिले डिजिटल सार्वजनिक सेवाउत्पादन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

West Zone Athletics
Goa Best Wedding Destination Award
Mahadev Shinde National Teacher Award 2026
Goa Local Jobs In Industrial Estates
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com