Mine Dumping In Goa: ‘ड्रोन लिडर’ या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणार खनिज डंप मापन, भूगर्भ खात्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

खनिज साठ्यांचा होणार ई-लिलाव
Drone Leader
Drone LeaderDainik Gomantak
Published on
Updated on

Mine Dumping In Goa राज्यातील खनिज डंपचा ई-लिलाव सोयीस्कर व्हावा यासाठी राज्यभर पसरलेल्या खाणीतील आणि खाणीतून बाहेर साठा करून ठेवलेल्या खनिज डंपचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचा निर्णय खाण व भूगर्भ खात्याने घेतला आहे.

खात्याने राज्यभरातील ७३३ दशलक्ष टन खनिज डंप असलेल्या ३१३ ठिकाणांची यादी तयार केली आहे. या खनिज डंपचा ई लिलाव सुरू झाला आहे. यापुढे हे काम अधिक सोयीस्कर व्हावे यादृष्टीने या ठिकाणांचे ‘ड्रोन लिडर’ सर्वेक्षण केले जाणार आहे.

Drone Leader
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये घट; तर दक्षिण गोव्यातील दरांत वाढ

यासंदर्भातची निविदा जारी करण्यात आली आहे. त्यानुसार १४ ऑगस्टपासून या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी या निविदा खुल्या करण्यात येतील. यानुसार बोलीधारक तांत्रिक आणि आर्थिक बोली सादर करू शकतील. यासंदर्भातील सर्व तपशील खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

काय आहे ‘ड्रोन लिडर’ सर्वेक्षण

लाइट डिटेक्शन आणि रेंजिग (लिडर) हे जमिनीच्या उंचीसह इतर बाबींचे अत्यंत अचूक मूल्यमापन करण्याचे तंत्र असून ते ड्रोनद्वारे वापरल्यास कोणत्याही जमिनीचे अथवा भू भागाचे सेंन्सरद्वारे अचूक सर्वेक्षण करू शकते. याचाच उपयोग आता खाण खाते करणार आहे. हेर ‘ड्रोन लिडर’ सर्वेक्षण फोटोग्रामेट्रीपेक्षा अधिक अचूक असते.

Drone Leader
Vijay Sardesai: 'अबकारी'तील गैरकारभाराप्रकरणी विरोधकांचा हल्लाबोल; कर वसूली आकडेवारीची सरकारकडून लपवाछपवी

खनिज साठ्यांचा होणार ई-लिलाव

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार खनिज साठ्यांचा ब्लॉक्स करून ई-लिलाव सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यातील ४ खनिज ब्लॉक्सचा डिसेंबर २०२२ मध्ये, तर दुसऱ्या टप्प्यातील ५ ब्लॉक्सचा एप्रिल २०२३ मध्ये ई-लिलाव यशस्वीपणे पार पडला आहे.

यापूर्वी खनिज डंपचे २८ ई-लिलाव झाले आहेत. आता ही ई-लिलावांची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि बोलीधारकांना याबाबतचा योग्य तपशील सादर करण्यासाठी ‘ड्रोन लिडर’द्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com