Goa: मांद्रे कॉलेजचे ५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

वाणिज्य शाखेसोबत (Commerce) आता कला (Arts) शाखेचा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सरकारकाडे (Goa Govt.)प्रस्ताव (Goa)
Former Union Minister Ramakant Khalap with Collage Administrative Dr. Pratiksha Khalap, in Mandrem Collage Goa. On Monday, 02 Aug, 2021.
Former Union Minister Ramakant Khalap with Collage Administrative Dr. Pratiksha Khalap, in Mandrem Collage Goa. On Monday, 02 Aug, 2021. Nivrutti Shirodkar
Published on
Updated on

मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स इकॉनॉमिक्स व मेनेजमेंट (Mandrem Collage of Commerce Economics & Management) या विद्यालयाचे विधिवत उद्घाटन (Inauguration) गुरुवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मांद्रे येथे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Leader of the Opposition Digambar Kamat), मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (Mandrem MLA Dayanand Sopate), गोवा युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरू वरुण सहानी (Goa University Vice-Chancellor Varun Sahani ), मोरजी जिल्हा पंचायत सदस्य (Morjim ZP Member) सतीश शेटगावकर, मांद्रे सरपंच (Mandrem Sarpanch) सुभाष आसोलकर, वकील सुरेंद्र सरदेसाई, वास्तुशिल्पकार नंदन सावंत यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मांद्रे विकास परिषदेचे चेअरमेन (Chairman of Mandre Development Council) व माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप (Former Union Minister Ramakant Khalap) यांनी आज कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (Goa)

Former Union Minister Ramakant Khalap with Collage Administrative Dr. Pratiksha Khalap, in Mandrem Collage Goa. On Monday, 02 Aug, 2021.
आमदार कुणावर उपकार करत नाही तर तो आपले कर्त्यव्य करतो; दयानंद सोपटे

रमाकांत खलप यांनी पत्रकारांशी बोलताना मांद्रे विकास परिषद हि शैक्षणिक संस्था मागच्या चाळीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून ज्ञानदानाचे कार्य करत असताना पूर्व प्राथमिक, प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा निर्माण केल्या. पूर्वी न्यू इंग्लिश हायस्कूल वारखंड, त्यानंतर मांद्रे न्यू इंग्लिश स्कूल. त्याचे त्यानंतर नामकरण रमाकांत खलप असे झाले. त्यानंतर सप्तेश्वर उच्च माध्यमिक इन्स्टिट्यूट, त्यानंतर महात्वाकांशी योजना म्हणजे मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स १० वर्षापूर्वी स्थापना झाली आणि नंतर २०११ साली ईव्वीस परवानगी मिळाल्यानंतरवाणिज्य शाखेसाठी गोवा सरकारने परवानगी दिली. २०१२ पासून पहिली बॅच सुरु झाली. आणि २०१३ , १४ व २०१५ सालची पहिली बेच पास झाली त्यानंतर पुढील बेच पास होवून गेली. या सर्व बॅचच्या विध्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल दिला, डिग्री घेवून वेगवेगळ्या क्षेत्रात ते विद्यार्थी कार्यरत आहेत.

Former Union Minister Ramakant Khalap with Collage Administrative Dr. Pratiksha Khalap, in Mandrem Collage Goa. On Monday, 02 Aug, 2021.
विजय सरदेसाई: दयानंद सोपट यांनी मांद्रे मतदारसंघ गहाण ठेवला

संस्थेला ग्रहण

खलप म्हणाले या शैक्षणिक संस्थेला मध्यंतरी काळात ग्रहण लागले होते. राजकारण घुसवून संस्था बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याविरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. न्यायालयातील खटला संस्था जिंकली आणि विध्यार्थी, शिक्षण आणि संस्थेचा विजय झाल्याचे खलप यांनी सांगितले. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे आता संस्थेचे मनोबल वाढले असल्याचे खलप म्हणाले. आता या पुढे हि संस्था भरारी घेऊन वाणिज्यशाखेच्या अभ्यासक्रमा बरोबर कला शाखेचा अभ्यासक्रम सुरु करण्याची परवानगी मागितलेली आहे. या वेळी कॉलेजसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करणार असल्याचे खलप यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला डॉक्टर प्रतीक्षा खलप, नारायण नाईक, मुख्याध्यापक मोहनदास चोडणकर, प्रा. सुमेक्षा गावकर व प्रा. अरुण नाईक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com