निवास समस्येमुळे गोव्याची असमर्थतता

क्रिकेट स्पर्धा घेणे अशक्य असल्याचे राज्य संघटनेचे बीसीसीआयला पत्र
Goa Cricket team
Goa Cricket team Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : सुमारे महिनाभर गोव्यातील तारांकित हॉटेलमध्ये जैवसुरक्षा वातावरणात निवास व्यवस्था अशक्य ठरल्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामने राज्यात खेळविण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. तसेच त्यासंबंधी पत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) पाठविले असल्याची माहिती जीसीए सचिव विपुल फडके यांनी बुधवारी दिली. (Goa's inability to play cricket matches in the state due to accommodation issues)

कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धा १७ मार्च ते १ मे या कालावधीत नियोजित आहे. सुरवातीस विलगीकरण प्रक्रिया व साखळी फेरीतील सामने आणि नंतर बाद फेरी सामने असे नियोजन आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ५ मार्च रोजी सर्व संलग्न संघटनांना पाठविलेल्या पत्रानुसार, स्पर्धेत एलिटमध्ये सहा व प्लेट गटात एक गट आहे. गोव्याला जी गटाचे यजमानपद असून त्यात कर्नाटक, दिल्ली, उत्तराखंड व हरियाना या संघांचा समावेश आहे.

Goa Cricket team
..तर ‘सोनसोडो’ची वीज तोडणार

विपुल यांनी सांगितले, की बीसीसीआयकडून स्पर्धा आयोजनासंदर्भात कळविण्यात आल्यानंतर आम्ही पर्वरी येथील जीसीए अकादमी व कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर (Bhausaheb Bandodkar Maidan)सामने खेळविण्याचे निश्चित केले. त्यानुसार तयारीस सुरवात केली. मात्र निवास व्यवस्था कळीचा मुद्दा ठरला. कोरोनाची (Corona) तिसरी लाट ओसरू लागल्यानंतर राज्यातील पर्यटन व्यवसाय पुन्हा तेजीत येण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे सुमारे महिनाभर जैवसुरक्षा वातावरणात राहण्यास हॉटेल व्यवस्थापन तयार नाही. जीसीए त्यांना प्रत्येक खोलीसाठी दरही तुलनेत कमी असल्यामुळे हॉटेल चालकांनी नाखुषी व्यक्त केली. त्यामुळे स्पर्धेसाठी दर्जेदार हॉटेल आरक्षित करणे कठीण ठरले. बुधवारी बीसीसीआयला ई-मेल पत्राद्वारे जीसीएने सामने घेण्याबाबतची असमर्थतता कळविली.

१५० हॉटेल खोल्यांची आवश्यकता

गटातील चार संघांतील खेळाडू, सपोर्ट स्टाफ, स्पर्धासंबंधित अधिकारी मिळून सर्वांसाठी जैवसुरक्षा वातावरणात १५० हॉटेल खोल्यांची आवश्यकता आहे. सुमारे महिनाभर कडेकोट व्यवस्था, तसेच हॉटेल (Hotel) कर्मचाऱ्यांसाठीही जैवसुरक्षा वातावरण आवश्यक आहे, अशी माहिती फडके यांनी दिली.

Goa Cricket team
धोकादायक सुमी शहरातून शेवटी जेडन बाहेर

नव्याने नियोजन

जी गटातील सामने खेळविण्यास गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Association) असमर्थता व्यक्त केल्यानंतर आता बीसीसीआयला (BCCI) नवे केंद्र शोधावे लागणार असून त्यामुळे स्पर्धा नियोजनातही बदल अपेक्षित आहे.

नऊ केंद्रांवर सामने

स्पर्धेत गोव्याचा (Goa) एफ गटात समावेश असून उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ हे संघ या गटात आहेत. गटातील सामने बंगळूर येथे खेळले जातील. याशिवाय पुदुचेरी (एलिट अ), सूरत (एलिट ब), त्रिवेंद्रम (एलिट क), इंदूर (एलिट ड), राजकोट (एलिट ई), दिल्ली (एलिट एच) व कटक (प्लेट) या ठिकाणी सामने नियोजित आहे. गोव्याने नकार केल्यामुळे नव्या केंद्राचा विचार केला जाईल हे स्पष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com