धोकादायक सुमी शहरातून शेवटी जेडन बाहेर

Russia-Ukraine War: जेडन परेराची इतर भारतीय विद्यार्थ्यां बरोबर पोलंडच्या दिशेने कूच
Jaden Perera
Jaden PereraDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : युक्रेनच्या सुमी या शहरात अडकलेला बाणावली येथील विद्यार्थी जेडन परेरा याला अन्य भारतीय विद्यार्थ्यांबरोबर बाहेर काढण्यात आले आहे. आता तो धोक्यातून बाहेर आल्याची माहिती एनआरआय कार्यालयातून माहिती मिळाली आहे. (Jaden Perera a student stranded in the Ukrainian city of Sumi released)

एनआरआय (NRI) संचालक अँथनी डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीमध्ये अडकलेल्या जेडन आणि अन्य भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास यश मिळाले असून आता त्यांनी पोलंडच्या (Poland) दिशेने कूच केली आहे.

रशियन सैन्याने सुमी शहरात लोकांची कोंडी करून ठेवल्याने शेकडो विद्यार्थी अडचणीत आले होते. तिथे अन्न आणि पाण्याचा साठा संपत आल्याने ते अडचणीत सापडले होते. शेवटी भारत सरकारने (Government of India) रशिया (Russia) आणि युक्रेन या दोन्ही देशातील सरकारांशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

Jaden Perera
'त्या' दहा आमदारांविरोधात चोडणकर सर्वोच्च न्यायालयात

युक्रेन (Ukraine) देशात गोव्यातील एकूण 21 विद्यार्थी (student) अडकले होते. त्यातील 20 विद्यार्थ्यांना आतापर्यंत सही सलामत मायदेशी आणले होते. मात्र एकटा जेडन तिथे अडकून पडला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com