Goa: पुराच्या चिखलात भाजपचे कमळ फुलणार नाही

Goa: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अविनाश भोसले यांचा टोला
Goa: Avinash Bhosle
Goa: Avinash BhosleDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : पुरामुळे ग्रामीण भागातील लोक बेघर झाले, चिखल झाला. मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister) साखळी (Sakhali - Goa) मतदारसंघात घराघरांत (House) चिखल (Mud) झाला असून या निवडणुकीत या चिखलात भाजपचे (BJP) कमळ (Lotus) फुलणार नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

Goa: Avinash Bhosle
Goa: गोव्यात तूर्त नेतृत्वबदल नाही

ते म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सरकारच्या कामगिरीला प्रशस्तीपत्र देणे म्हणजे स्वतःच स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासारखे आहे. भाजप पुन्हा सत्तेवर येईल हा त्यांचा भाबडा आशावाद आहे. सरकारला त्यांच्याच नेत्याने नव्हे, तर जनतेने प्रमाणपत्र दिले पाहिजे. २०१७ मध्ये राजमार्गाने भाजप सत्तेवर आला नाही हे बहुधा नड्डा विसरले असावेत. राज्यातील औषध कंपन्यांत किती गोमंतकीयांना रोजगार मिळाला ते त्यांनी सांगावे. खाणी आपण बंद केल्या असे छातीठोकपणे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सांगितले होते याचाही सोयीस्कर विसर भाजपला पडला आहे. प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे म्हणाले, जाहीर धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असताना भाजपच्या अध्यक्षांचे आरती, ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले गेले. नड्डा यांनी दोन दिवस गोव्यासाठी दिले, पण पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. विमानतळावरून ते पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी तडक गेले असते, तर आम्हीही त्यांना मानले असते. बार्देश तालुक्यात गेल्या वर्षी आलेल्या पुरात दोनेकशे शेतकऱ्यांचे २५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. ती भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे भाजप ज्या विकासाविषयी बोलत आहे तो कोणाला झाला आहे?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com