Goa: गोव्यात तूर्त नेतृत्वबदल नाही

जे.पी. नड्डा : आगामी निवडणूक प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच
J p Nadda Visit Tapobhumi Kundaim Goa
J p Nadda Visit Tapobhumi Kundaim GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात (Goa State) मुख्यमंत्री (Cm) डॉ. प्रमोद सावंत (Dr Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील सरकारची (Goa Government) यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे, तर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Central Minister Shripad Naik) हे दिल्लीमध्ये (Delhi) उत्तम कामगिरी बजावत आहेत. कोणताही निर्णय भाजपचे (Bjp) संसदीय मंडळ घेत असल्याने कोणी इच्छा व्यक्त केली म्हणून निर्णय होत नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J p Nadda) यांनी स्पष्ट केले. तूर्त राज्यात नेतृत्वबदल नसल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या नेतृत्वबदल चर्चेला पूर्णविराम मिळाला असून सावंत यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढविली जाण्याची शक्यता आहे. श्रीपाद नाईक यांना दिल्लीतून राज्यातील राजकारणात उतरवणार का? असा प्रश्‍न पत्रकारांनी केला असता नड्डा यांनी थेट उत्तर देणे टाळले. सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गेल्या चार वर्षांत चांगली प्रगती केली आहे व योग्य दिशेने पुढे जात आहे. भाजप फॅमिलीराजविरोधात आहे. आगामी निवडणुकीत गोव्यात एकाच कुटुंबामध्ये दोघांना उमेदवारी देणार का? यासंदर्भात ते म्हणाले, गोव्याबाबत मला अधिक माहिती नाही. मात्र, पक्षाची राज्य निवडणूक समिती यासंदर्भात निर्णय घेईल. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, (Sadanand Shet Tanavade) राज्यसभेचे खासदार सय्यद जाफर (Sayyad Jafar) आणि गोवा प्रभारी सी. टी. रवी (C T Ravi) उपस्थित होते.

J p Nadda Visit Tapobhumi Kundaim Goa
Goa: 'तिळारी' शांत, जलविसर्गाचा धोका नाही

काल व आजच्या भेटीवेळी (Goa Visit) विविध बैठकांत पक्ष मजबूत करण्यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीतील चर्चेमधून मी आशावादी तसेच पक्षाच्या कामाबाबत समाधानी आहे. मंत्री, (Bjp Ministar) आमदार, (Mla) कार्यकर्ते (Workars) कामात झोकून देत आहेत. जे आमदार काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये आले, त्यांच्याशी मी वैयक्तिक चर्चा केली. त्यांनीही भाजपच्या कार्यशैलीबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळेच भाजप गोव्यात योग्य दिशेने व वेळेनुसार पुढे जात असल्याचे मत नड्डा (J P Nadda) यांनी व्यक्त केले. २०१७ ते २०२१ या काळात भाजप सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांचा पाहता चांगली प्रगती केली आहे. गोवा (Goa) हे छोटे राज्य (Small State) असूनही विकासकामांत सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. पूर्वीपेक्षा आता गोव्यातील प्रतिमा बदलली आहे. कोविड काळात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले तरी विकासकामांत राज्य पुढे जात आहे. मोपा विमानतळ २०२२ मध्ये सुरू होणार आहे, तसेच फार्मा (Farma) व शैक्षणिक हब (Education Hub) उभे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

J p Nadda Visit Tapobhumi Kundaim Goa
Goa flood: गिरीश चाेडणकर यांची वाळपईत पुरग्रस्त भागाची पाहणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com