Goa in charge Mahua Moytra said Trinamool will field woman candidate for post of GoaCM
Goa in charge Mahua Moytra said Trinamool will field woman candidate for post of GoaCMDainik Gomantak

...तर तृणमूल पक्षाकडून मुख्यमंत्रीपदी महिला!

पणजीतील ‘टीएमसी’च्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महुआ मोयत्रा बोलत होत्या. यावेळी काँग्रेसच्या इथेल लोबो तृणमूल पक्षात दाखल झाल्या.
Published on

पणजी: राज्यात सक्षम महिला उमेदवार आम्हाला मिळाली तर गोवा तृणमूल काँग्रेसकडून त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यात येईल. आमच्या पक्षात महिला व पुरुष असा भेदभाव केला जात नाही, अशी माहिती तृणमूल (टीएमसी) गोवा प्रभारी तथा खासदार महुआ मोयत्रा  यांनी केले आहे.  पणजीतील ‘टीएमसी’च्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महुआ मोयत्रा बोलत होत्या. यावेळी काँग्रेसच्या इथेल लोबो तृणमूल पक्षात दाखल झाल्या.

मोयत्रा म्हणाल्या, राज्य प्रभारी म्हणून माझा पहिला दिवस आहे. इथेल लोबो गोव्याच्या सामाजिक जडणघडणीचा एक भाग आहे. मी त्यांचे ‘टीएमसी’ कुटुंबात स्वागत करत आहे. बंगालमध्ये आम्ही महिलांना सर्वाधिक मान, प्रतिष्ठा दिली आहे. त्याप्रमाणे गोव्यातही महिलांना मानाचे स्थान दिले जाईल. सक्षम महिला तृणमूलचा मुख्यमंत्र्याचा चेहरा असेल, असे सांगत महुआ मोयत्रा यांनी काँग्रेस, भाजपवर टिकास्त्र सोडले.

Goa in charge Mahua Moytra said Trinamool will field woman candidate for post of GoaCM
गोव्यात भंडारी समाजाचे राजकारण करायला नाही तर त्यांचा हक्क मिळवून द्यायला आलोय

पूर्वीची काँग्रेस आता राहिली नाही: इथेल लोबो

तृणमूलमध्ये दाखल झालेल्या दक्षिण गोव्यातील काँग्रेसच्या नेत्या इथेल यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, ममता बॅनर्जींचा साधेपणा आपल्याला नेहमीच भावला आहे. त्यांनी बंगालमध्ये भाजप विरोधात लढा दिला. त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांच्यातील लढाऊ भावनेनेच मला ‘टीएमसी’मध्ये सामील होण्याची प्रेरणा मिळाली. त्या महिला सक्षमीकरणाचे प्रतिक आहेत. त्यांनी संसदेत 33 टक्के महिला खासदारांची खात्री दिली आहे. पूर्वीची काँग्रेस आता राहिली नाही तर ती केवळ दलाल, भ्रष्टाचारी लोकांची पार्टी बनली आहे.

Goa in charge Mahua Moytra said Trinamool will field woman candidate for post of GoaCM
कर्मचारी भरतीचा आदेश मागे! काँग्रेसच्या आरोपानंतर गोवा सरकारला आली जाग

आलेमाव, वालांका तृणमूलमध्ये जाणार?

इथेल यांच्या मागोमाग आता राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव त्यांची कन्या वालंका आलेमाव तृणमूलमध्ये जाणार असल्याचे चर्चा आहे. त्यानंतर दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्दिनही तृणमूलच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. याला प्रभारी महुआ यांनी नाव न घेता दुजोरा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com