गोव्यात भंडारी समाजाचे राजकारण करायला नाही तर त्यांचा हक्क मिळवून द्यायला आलोय

गोव्यात सर्वात जास्त भंडारी समाज असून यात शिक्षिक, औद्योगिक, वैद्यकीय, अभियंता, वैज्ञानिक, राजकीय, कृषी क्षेत्रात जास्त युवक या समाजाचे असल्याने आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री भंडारी समाजाचा असणार आहे
Arvind Kejriwal said i am not come to do politics of Bhandari community in Goa
Arvind Kejriwal said i am not come to do politics of Bhandari community in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांना ध्येय धोरण राबवून टॅक्सीवाल्यांना सामावून राज्यात पर्यटक टॅक्सी महामंडळ स्थापन करणार आहे. एखाद्या टॅक्सी चालकाला अपघात झाल्यास त्याचा पूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तसेच उच्च न्यायालयात टॅक्सी मीटरच्या आदेशामुळे टॅक्सी व्यावसायिकांना समस्या सोसाव्या लागतात. राज्य सरकारने उच्च न्यायालयात टॅक्सी व्यावसायिकांची बाजू योग्यरीत्या मांडली नसल्याने अशा प्रकारचा आदेश आला आहे. या आदेशाला आम आदमी पक्ष पुढच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात गोव्याला एकमेव भंडारी समाजाचा मुख्यमंत्री प्राप्त झाला आहे. गोव्यात सर्वात जास्त भंडारी समाज असून यात शिक्षिक, औद्योगिक, वैद्यकीय, अभियंता, वैज्ञानिक, राजकीय, कृषी क्षेत्रात जास्त युवक या समाजाचे असल्याने आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री भंडारी समाजाचा असणार आहे. मी गोव्यात समाजाचे राजकारण करायला आलेलो नसून फक्त त्यांचा हक्क त्यांना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली.

Arvind Kejriwal said i am not come to do politics of Bhandari community in Goa
गोव्याला पुढे नेण्यासाठी आम आदमीचे सरकार येणे गरजेचे: अरविंद केजरीवाल

दाबोळी नवेवाडे येथील जय संतोषीमाता संस्थांनच्या सभागृहात पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्या विषयी आयोजित बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत गोव्याचे आपचे मुख्य निमंत्रक राहुल म्हाबरे, उपाध्यक्ष तथा दाबोळी मतदार संघाचे प्रमुख प्रेमानंद (बाबू) नानोस्कर, उपाध्यक्ष संदेश तेलेकर, सरचिटणीस पुतू गावकर, वोल्गा विएगस, कळंगुटचे पंच सुदेश मयेकर, गोवा टॅक्सीचालक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत व इतर आपचे नेते उपस्थित होते. यावेळी सभागृहात मोठ्या प्रमाणात टॅक्सी व्यवसायिक उपस्थित होते. पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले की राज्य सरकार टॅक्सी व्यवसायिकांना संपवण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. गोव्यात व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचे षडयंत्र राज्य सरकार करीत असून आम आदमी पक्ष टॅक्‍सी व्यवसायिकांच्या बाजूने ठामपणे उभा राहणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन करण्यास ऑटो रिक्षा, टॅक्सी व्यावसायिकांचा महत्त्वाचा वाटा होता, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. गोव्यातील व्यवसायिकांना चार हमी (आश्वासने) देण्यात येणार असून यात गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांचा हक्क देण्यासाठी सरकारचे दोन अधिकारी, तर टॅक्सी व्यावसायिकांचे चार अधिकाऱ्यांना सामावून महामंडळ स्थापन करणार आहे. एखाद्या टॅक्सी चालकाला अपघात झाल्यास त्याचा पूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असून यात त्यांच्या कुटुंबाला सुद्धा मदत करणार आहे. वाहतूक खात्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कार्यालयातील सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करणार आहे. टॅक्सी व ऑटो व्यावसायिकांना फक्त फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी वाहतूक कार्यालयात जावे लागणार. यामुळे वाहतूक विभागातील भ्रष्टाचार कमी होणार अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. राज्यसरकारने येथील टॅक्सी व्यवसायिकांना डिजिटल मीटर बसवून एका प्रकारे आर्थिक संकटात टाकले आहे. कोविड महामारीमुळे टॅक्सी व्यवसाय पूर्णपणे बंद असताना सुद्धा राज्य सरकारने जोर जबरदस्तीने टॅक्सींना डिजिटल मीटर बसवले. यामुळे टॅक्सी व्यावसायिकांना पुन्हा एकदा आर्थिकरित्या संकटात सापडले. यामुळे गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांना न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागले ते सुद्धा राज्य सरकारने टॅक्सी व्यवसायिकांची बाजू योग्यरीत्या मांडली नसल्याची माहिती एका आदेशाद्वारे प्राप्त झाली आहे. डिजिटल मीटरच्या विरोधात आम आदमी पक्ष सर्वोच्च न्यायालयात टॅक्सी व्यावसायिकांसाठी आव्हान देणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. मी गोव्यात येऊन जनतेला मोफत वीज असे जाहीर केले तर येतील सावंत सरकारने पाणी मोफत देण्याची घोषणा घोषित केले. आम आदमी पक्ष जनतेच्या भल्यासाठी सदैव पुढाकार घेत असल्याने गोव्यातील भाजप सरकार आम आदमी पक्षाला घाबरले असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली.

Arvind Kejriwal said i am not come to do politics of Bhandari community in Goa
Goa Election: 'गोव्यात भंडारी समाजाचा मुख्यमंत्री बनणार'!

गोव्यात बहुजन समाज मोठ्या प्रमाणात असून यात भंडारी समाज अग्रस्थानी आहे. पण राज्यातील सरकारने सदैव भंडारी समाजवर अन्याय केला आहे. यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपचे सरकार स्थापन झाल्यास, राज्याच्या मुख्यमंत्री भंडारी समाज असणार आहे. मी गोव्यात समाजाचे राजकारण करायला आलेलो नसून, फक्त भंडारी समाजाला त्याचा हक्क त्याना देण्यासाठी आलो असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. गोव्यात समाजाचे राजकारण करून आम आदमी पक्ष सरकार स्थापन करणार नसून सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. गेल्या ६० वर्षात भंडारी समाजाचा एकमेव मुख्यमंत्री गोव्याला लाभला. कारण येथील राजकीय पक्षानी भंडारी समाजाला फक्त मतासाठी उपयोग केला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. गोव्यातील जनता शिक्षित असून आपच्या बाजूने येऊ लागली असल्याने राज्य सरकारच्या पायाखालची जमीन सरकू लागली असल्याची माहिती शेवटी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली. आपचे उपाध्यक्ष प्रेमानंद नानोस्कर म्हणाले की, गोव्यात आम आदमी पक्षाची हवा असून येणारे सरकार आपचे असणार आहे. दिल्लीचा विकास मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यशस्वीरीत्या पार पाडला असून, त्याच धर्तीवर गोव्याचा सुद्धा विकास होणार असल्याची माहिती नानोस्कर यांनी दिली. गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी आपला पक्ष सदैव पुढाकार घेणार आहे. केजरीवाल यांचे नेतृत्व गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती नानोस्कर यांनी दिली. यावेळी गोव्याचे आपचे मुख्य निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी राज्य सरकार वर टीका करताना सांगितले की गोव्यातील सरकारने विकासाच्या नावाने भ्रष्टाचार माजवला आहे. सरकार सर्व स्थरावर अपयशी ठरले असल्याची माहिती त्यांनी दिली.

-प्रदिप नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com