Panaji Municipal Corporation: टोंक येथील चार अतिक्रमणांवर महानगरपालिकेचा हातोडा; नोटीस न देताच कारवाई केल्याचा आरोप

Municipality Action On Encroachments: महानगरपालिकेला ही कारवाई करताना पोलिसांचा बंदोबस्त घ्यावा लागला. जेसीबी, कर्मचाऱ्यांचा ताफा ही अतिक्रमणे हटविण्यासाठी कार्यरत होता.
Goa Encroachment: टोंक येथील चार अतिक्रमणांवर महानगरपालिकेचा अखेर हातोडा; नोटीस न देताच कारवाई केल्याचा मालकांचा आरोप
Municipality Action On EncroachmentsDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji Municipal Corporation

पणजी: टोंक-करंजाळे येथे ज्योएल बारच्या शेजारी आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या अतिक्रमण करून बेकायदा व्यवसाय करणाऱ्या चार दुकानांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला. राजकीय वरदहस्तामुळे या अतिक्रमणाकडे कानाडोळा होत होता, परंतु अखेर महानगरपालिकेला या अतिक्रमणावर हातोडा मारावा लागला.

महानगरपालिकेला ही कारवाई करताना पोलिसांचा बंदोबस्त घ्यावा लागला. जेसीबी, कर्मचाऱ्यांचा ताफा ही अतिक्रमणे हटविण्यासाठी कार्यरत होता. सकाळी पावणेबाराच्या सुमारास अतिक्रमण (Encroachment) हटवण्यास सुरवात झाली. दुकानगाळ्यांसमोर दुकाने थाटून व्यवसाय चालला होता. महानगरपालिकेने कोणतीही नोटीस बजावली नसताना थेट कारवाई केल्याचे दुकानमालकांचे म्हणणे आहे. तिसवाडी मामलेदार, महानगरपालिकेचे अकाऊंट अधिकारी थॉमस, निरीक्षक दीपक सातार्डेकर व पालिका कर्मचाऱ्यांचा ताफा कारवाईत होता. ज्यांचे घर व दुकान पाडण्यात आले, त्यांचे १९८१ पासून आपले घर आहे, पण आत्तापर्यंत कोणतीही नोटीस बजावलेली नाही, तरीही कारवाई करण्यात आली, असे म्हणणे आहे.

Goa Encroachment: टोंक येथील चार अतिक्रमणांवर महानगरपालिकेचा अखेर हातोडा; नोटीस न देताच कारवाई केल्याचा मालकांचा आरोप
Goa Encroachment: अतिक्रमणधारकांनी स्वतःहून हटविली घरे!

चार दुकाने पाडण्याची कारवाई करताना कर्मचाऱ्यांनी सर्व साहित्य बाजूला काढले आणि त्यानंतर काही बांधकाम होते, ते जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले. दुकानावरील पत्रे व इतर अतिक्रमित साहित्य कामगारांनी हटविले.

Goa Encroachment: टोंक येथील चार अतिक्रमणांवर महानगरपालिकेचा अखेर हातोडा; नोटीस न देताच कारवाई केल्याचा मालकांचा आरोप
Encroachment Goa : पर्रा-म्हापसा मार्गावरील अतिक्रमणावर धडक कारवाई!

पूर्व कल्पना न दिल्याचा आरोप

वाहनांचे पंक्चर काढण्याचे दुकान, त्याचबरोबर किराना-स्टेशनरी व वाईन विक्रीचे दुकान या ठिकाणी होते. सिलीर आल्मेदा या कुटुंबातर्फे हे व्यवसाय सुरू होते. कुटुंबांच्या सदस्यांकडून महानगरपालिकेच्या कारवाईला अजिबात विरोध झाला नाही. त्यांनी अतिक्रमण काढू दिले, परंतु त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अतिक्रमण असल्याची आम्हाला कोणतीही नोटीस बजावली नाही. आम्ही अधिकाऱ्यांकडे नोटीस मागितली, तर तीही त्यांनी दाखवली नाही, असा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com