Goa HSC Result: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी जाहीर होणार निकाल; कुठे, कसा पाहाल? जाणून घ्या सविस्तर

Goa HSC Result 2025: मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
Goa HSC Result
Goa HSC ResultDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी म्हणजेच 27 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी 10 फेब्रुवारी ते 1 मार्च या काळात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून 17,686 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यात 8462 मुले आणि 9224 मुलींचा समावेश आहे.

राज्यातील एकूण वीस परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी पाचनंतर ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येईल.

Goa HSC Result
Goa HSC CBSE Result 2024: अनिश कांबळी राज्यात अव्वल; बारावी परिक्षेत मिळवले ९८.२० टक्के गुण

कुठे पाहाल निकाल?

गुरुवारी सायंकाळी पाचनंतर विद्यार्थ्यांना result.gbshsegoa.net आणि gbshse.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. तसेच, शाळांना विद्यार्थ्यांचे निकालपत्र service1.gbshse.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com