Fish Production : गोव्यालगतच्या समुद्रात मत्स्योत्पादन किती घटले हे तपासावे लागणार : डॉ. शमिला मोंतेरो

Fish production : एल-निनोचा फटका, मासेमारीवर परिणाम
goa
goaDainik Gomantak

Fish Production :

पणजी, प्रशांत महासागरात एल निनो प्रवाह सक्रिय झाल्याचा परिणाम गोव्याच्‍या समुद्रालगतच्या मासेमारीवर हंगामात झाला होता.

यामुळे मत्स्योत्पादन किती घटले हे तपासावे लागणार आहे. एल-निनोचा जगालाच फटका बसला आहे. गोव्याच्या मासेमारीवर साहजिकपणे त्याचा परिणाम जाणवलेला आहे, असे मत्स्योद्योग खात्याच्या संचालक डॉ. शमिला मोंतेरो यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि शेती संघटनेने (एफएओ) द स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अॅण्ड अक्वाकल्चर २०२४, हा अहवाल जाहीर केला आहे. जागतिक मत्स्य उत्पादनाचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.

goa
Goa G-20 Summit: जी-२० पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीत आभासी पद्धतीने पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

त्या अनुषंगाने डॉ. मोंतेरो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रशांत महासागरात २०२३-२४ मध्ये सक्रिय असलेल्या एल-निनोचा परिणाम म्हणून समुद्रातील मत्स्य आणि अन्य जलचरांचा अधिवास धोक्यात आला आहे, अशी जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्यामुळे विविध प्रकारच्या समुद्री शैवालांच्या वाढीवर परिणाम झाला.

मासे आणि अन्य जलचरांना अपेक्षित खाद्य मिळाले नाही, त्यांना अनुकूल अधिवास मिळाला नाही. पुरेसे खाद्य न मिळाल्यामुळे माशांनी स्थलांतर केल्याचे दिसून आले. अनेक प्रजातींच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम झाला. परिणामी सागरी जलचरांच्या उत्पादनातही घट झाली. मात्र गोव्यालगतच्या समुद्रात हा परिणाम कितपत जाणवला हे आताच सांगता येणार नाही.

भारत दुसऱ्या क्रमांकावर

मासे आणि अन्य जलचरांना अपेक्षित खाद्य मिळाले नाही, त्यांना अनुकूल अधिवास मिळाला नाही. पुरेसे खाद्य न मिळाल्यामुळे माशांनी स्थलांतर केल्याचे दिसून आले. अनेक प्रजातींच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम झाला. परिणामी सागरी जलचरांच्या उत्पादनातही घट झाली. मात्र गोव्यालगतच्या समुद्रात हा परिणाम कितपत जाणवला हे आताच सांगता येणार नाही.

आशियाचा वाटा ३४ टक्के

एकूण जागतिक उत्पादनात पॅसिफिक समुद्राचा वाटा ४१ टक्के आहे. त्या खालोखाल आशिया आणि आशियातील गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा ३४ टक्के आहे. अटलांटिक महासागर आणि शेजारील समुद्रातील मासेमारीचा वाटा १३ टक्के आहे. हिंदी महासागराचा वाटा सात टक्के आहे, अशी आकडेवारी अहवालात नमूद करण्यात आली आहे.

उत्पादनात चार टक्क्यांनी वाढ...

अहवालात म्हटले आहे की, जागतिक मत्स्य उत्पादन २०२२ मध्ये १८५० लाख टनांवर पोहोचले आहे. २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये जागतिक उत्पादनात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण उत्पादनापैकी सुमारे ५१ टक्के म्हणजे ९४० लाख टन उत्पादन मत्स्य शेतीतून मिळाले आहे.

समुद्र आणि नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहातील मासेमारीचा वाटा ४९ टक्क्यांवर गेला असून, ९१० लाख टन उत्पादन झाले आहे. एकूण उत्पादनात समुद्रातील मत्स्य आणि जलचर उत्पादनाचा वाटा ६२ टक्क्यांवर म्हणजे ११५० लाख टनांवर गेला आहे, तर गोड्या पाण्यातील उत्पादन ३८ टक्क्यांवर म्हणजे ७०० लाख टनांवर गेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com