Goa Horticulture Corporation स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर!

Goa Horticulture : महामंडळ इतर राज्यातून भाज्या आणि फळे आयात थांबवणार आहे.
Goa Horticulture Corporation
Goa Horticulture CorporationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Horticulture Corporation: गोवा मुक्त झाल्यापासून आम्ही अत्यावश्यक वस्तूंसाठी शेजारच्या राज्यांवर अवलंबून आहोत. हे थांबवण्याची आवश्‍यकता असून केंद्राच्या आत्मनिर्भर भारत धोरणानुसार राज्यात स्वयंपूर्ण गोवा उपक्रम राबवला आहे.

उपक्रमाअंतर्गत लवकरच येणाऱ्या दिवसांमध्ये गोवा फलोत्पादन महामंडळ स्वयंपूर्ण होणार आहे. महामंडळ इतर राज्यातून भाज्या आणि फळे आयात थांबवणार आहे. तसेच गोव्यातील शेतकऱ्यांकडून या खरेदी केल्या जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. दोनापावल येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Goa Horticulture Corporation
Yuri Alemao : विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतरही युरी आलेमाव नाखूष का?

गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने येथे मोठ्या संख्येत पर्यटक येतात. पर्यटन उद्योगाला लागणाऱ्या अत्यावश्‍यक वस्तूंसाठी आम्ही शेजारच्या राज्यांवर अवलंबून आहे. याच वस्तू गोव्यात उत्पादित झाल्यास याचा लाभ राज्याला होणार आहे.

काल आम्हांला सुमारे 4.50 लाख लिटर दुधाची गरज असते. त्यांपैकी 1 लाख लिटर दूध येथे उत्पादित केले जाते, परंतु इतर 3.50 लाख लिटर आयात केले जात आहे. ही मागणी आम्ही पूर्ण केल्यास गोमंतकीयांना स्वस्त दरात वस्तू मिळणार आहे. कारण वस्तू आयात केल्यानंतर त्यांचा दर वाढतो, असे डॉ. सावंत म्हणाले.

Goa Horticulture Corporation
Goa Politics : विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग बिकट; सभापतींची भूमिका ठरणार निर्णायक

गोव्यात वस्तूंचे पाहिजे एवढे उत्पादन होत नसून दाखवण्यापुरती उत्पादन केले जात आहे. हे काय पुरेसे नाही. त्यासाठी गोमंतकीयांनी उत्पादन गंभीरपणे घेण्याची गरज आहे.राज्य सरकारकडून स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वेग वेगळे कार्यक्रम केले जात आहे. याचा लाभ घेऊन नागरिकांनी उपक्रमात सहभागी होण्याची आवश्‍यकता आहे.

प्राकृतिक उपक्रम: गोव्यातील जैवविविधता मंडळातर्फे सध्या ‘गोवन’ म्हणून प्राकृतिक उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत पडीक फळांचा वापर करुन खाद्यपदार्थ तयार केले जात आहे. डिचोलीतील साळ आणि कुडचडेतील पंटेमळ येथे उत्पादन केंद्र सुरू झाली आहे. लवकरच राज्यात इतर ठिकाणी देखील केंद्र येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com