Yuri Alemao : विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतरही युरी आलेमाव नाखूष का?

काँग्रेसच्‍या पक्षश्रेष्‍ठींनी विधिमंडळ गटनेतेपदी युरी आलेमाव यांची निवड केली आहे. तथापि, हे पद स्‍वीकारण्‍यास ते इच्‍छुक नाहीत
Yuri alemao
Yuri alemaoDainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao : काँग्रेसच्‍या पक्षश्रेष्‍ठींनी विधिमंडळ गटनेतेपदी युरी आलेमाव यांची निवड केली आहे. तथापि, हे पद स्‍वीकारण्‍यास ते इच्‍छुक नाहीत. तर दुसऱ्या बाजूने काँग्रेसमध्‍ये गोवा फॉरवर्डचे विलिनीकरण करण्‍यासही विजय सरदेसाई यांना फारसे स्‍वारस्‍य नाही. परिणामी आधीच मनोधैर्य खचलेल्‍या काँग्रेसची वाट अधिक खडतर बनली आहे.

दोन तृतीयांश आमदार फुटल्‍यानंतर गर्भगळीत झालेल्‍या काँग्रेसला बळकटी मिळावी, यासाठी पक्षांतर्गत प्रयत्‍न सुरू आहेत. काँग्रेसने तातडीने कुंकळ्ळीचे आमदार तथा पक्षाचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्‍लीतील श्रेष्‍ठींच्‍या आदेशाद्वारे आलेमाव यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. ‘पक्षाने दिलेली जबाबदारी मी सांभाळेन, मी आनंदी आहे’, अशी प्रतिक्रिया युरी आलेमाव यांनी दिली आहे. मात्र, वास्‍तवात आलेमाव हे पदभार सांभाळण्‍यास उत्‍सुक नाहीत, असे सूत्रांचे म्‍हणणे आहे.

...म्‍हणून युरी आलेमाव नाखूष

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षश्रेष्‍ठींनी राहुल गांधी यांची भेट घडवून आणावी; त्‍यांच्‍यासोबत चर्चेअंती विधिमंडळ गटनेतेपदाचा ताबा घेणे योग्‍य ठरेल, अशी युरी आलेमाव यांची अपेक्षा होती. परंतु, प्रत्‍यक्षात ती फोल ठरली आहे. दुसरीकडे सध्‍या आपल्‍या नावाचा वापर करून घेण्‍यात येईल. मात्र, निवडणुकीच्‍या तोंडावर आपल्‍याकडे अधिकार राहतील का, अशी शंकाही त्‍यांना आहे. युरी हे गेले दोन महिने राहुल, सोनिया यांच्‍याशी संपर्काचा प्रयत्‍न करत होते; पण तो होऊ शकला नाही.

Yuri alemao
Goa Forward Party : गोवा फॉरवर्डचा ‘नारळ’ लवकरच कॉंग्रेसच्या हातात

तिन्ही आमदारांचा भ्रमनिरास

फुटीर आमदारांनी भाजप प्रवेश केल्‍यानंतर उरलेल्‍या काँग्रेसच्‍या तीन आमदारांना राहुल, सोनिया यांची भेट घडेल वा फोन येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, राहुल सध्‍या ‘भारत जोडो यात्रे’त व्‍यस्‍त आहेत, तर सोनियांनीही दाद दिली नाही. विधिमंडळ नेता निवडीनंतरही हीच स्‍थिती राहिली. त्‍यामुळे तिन्ही आमदारांचा भ्रमनिरास झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com