Kadamba Bus Accident: बसच्या धडकेत महिलेचा पाय जायबंदी, स्थानिकांच्या सतर्कपणाने प्राणहानी टळली

होंड्यात अपघात : पोलिस चौकीसमोरील घटना
Bus Accident
Bus AccidentDainik Gomantak

Kadamba Bus Accident होंडा पोलिस चौकीसमोरील रस्त्यावर गुरुवार, 24 रोजी दुपारी 1.30 वा.च्या दरम्यान होंडा महावीर सरकारी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कदंब बसच्या (जीए०३-एक्स-०५७५) समोरील चाकाखाली एक महिला सापडून तिला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.

या महिलेचे नाव सुजिता लवू शेटकर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यावेळी काहीजणांनी आरडाओरडा करून बस उभी करण्यास सांगितल्याने प्राणहानी टळली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरील बस होंड्याच्या दिशेने येऊन पोलिस चौकीसमोरील रस्त्यावरून उजव्या बाजूने वळवताना त्याच बाजूने चालत असलेल्या सुजिता लवू शेटकर या महिलेला बसची धडक बसली.

ही धडक बसताच सुजिता शेटकर या वाहनचालकाच्या बाजूने असलेल्या समोरच्या चाकाखाली सापडल्या. तरीही वाहन चालकाला या गोष्टीची कोणतीच कल्पना न आल्याने त्याने बस तशीच पुढे घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुजिता शेटकर यांच्या डाव्या पायावरून चाक गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Bus Accident
Banastarim Bridge Accident: परेश सावर्डेकरच कार चालवत होता, पत्‍नीसह मुलांची न्यायालयात जबानी

होंडा पंचायतीची आज बैठक असल्याने सरपंच, उपसरपंच व सर्व पंच एकत्र होते. या अपघाताची माहिती मिळताच त्या सर्वांनी तेथे धाव घेऊन सुजिता यांना सावरण्याचा प्रयत्न केला, तर पंच सुमेधा माडकर या स्वत: १०८ रुग्णवाहिकेतून त्यांच्यासोबत साखळी सामाजिक आरोग्य केंद्रापर्यंत गेल्या.

दरम्यान, ही घटना होंडा पोलिस चौकीसमोर घडली असल्याने तेथील पोलिसांनी पंचनामा करून बस व चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Bus Accident
Agriculture Sector In Goa: कृषी खातं राबवतंय तब्बल 35 योजना तरीही बळीराजाची शेतीकडे पाठ, लागवड क्षेत्रात घट होण्याची कारणे समोर

मुलाला आणण्यासाठी जात होती महिला

ही घटना घडताच तत्काळ 108 रुग्णवाहिकेला पाचारण करून त्या महिलेला प्रथम साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करून तेथे प्राथमिक उपचार केले. नंतर गोवा मॅडिकल कॉलेज बांबोळी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

ही महिला होंडा-नारायणनगर येथे भाड्याने राहते व ती होंडा विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी आली होती, अशी माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com