Banastarim Bridge Accident
Banastarim Bridge AccidentDainik Gomantak

Banastarim Bridge Accident: परेश सावर्डेकरच कार चालवत होता, पत्‍नीसह मुलांची न्यायालयात जबानी

मेघना व तिच्या मुलांची वैद्यकीय चाचणी झाली आहे.
Published on

Banastarim Bridge Accident बाणस्तारी अपघात प्रकरणाच्या चौकशीवेळी संशयित परेश सावर्डेकर याने आपणच स्वत: कार चालवत असल्याचे सांगितले आहे.

तसेच संशयिताची पत्नी मेघना सावर्डेकर व तिच्या तीन मुलांची पोलिसांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 161 व कलम 164 खाली फोंडा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंदविली. त्‍यावेळी त्‍यांनीही परेश हाच कार चालवत असल्याचे सांगितले आहे.

Banastarim Bridge Accident
President Droupadi Murmu In Goa: अन्‌ अचानक थांबला राष्‍ट्रपतींचा ताफा! विद्यार्थीही भारावले, त्याचं झालं असं की...

मेघना व तिच्या मुलांची वैद्यकीय चाचणी झाली आहे. संशयित परेश सावर्डेकर याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. तो 8 दिवसांची पोलिस कोठडी व नंतर 14 दिवसांच्‍या न्यायालयीन कोठडीनंतर मंजूर झाला आहे.

दरम्यान, संशयित परेश सावर्डेकर याची बाजू ज्येष्ठ वकील सरेश लोटलीकर यांनी मांडली. संशयित तसेच त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना तपासकामात सहकार्य केलेले आहे. कार संशयित चालवत होता हे उघड झाले आहे.

सावर्डेकर कुटुंबीयांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना तसेच जखमींना मदतीचा हात दाखवताना 2 कोटी रुपये न्यायालयात जमा केलेले आहेत. तसेच न्यायालय ज्या अटी घालीत त्या मान्य असतील असा युक्तिवाद केला.

Banastarim Bridge Accident
Banastarim Bridge Accident: गुंतागुंत वाढली! साक्षीदार स्वतःहून पुढे येईनात! पिडीतांना न्याय मिळणार?

जामिनासाठी घातलेल्या अटी

  • एक लाख रुपये वैयक्तिक हमी व तत्सम रकमेचा एक हमीदार.

  • क्राईम ब्रँचमध्ये आठवडाभर सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत हजेरी.

  • पासपोर्टची माहिती न्यायालयात सादर करणे.

  • साक्षीदारांशी संपर्क साधू नये, तपासात अडथळा आणू नये.

  • अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी उपस्थित रहावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com