Goa:प्रकाशमय होंड्यात फिरोजा शाह मात्र अंधारात

वीज जोडणीसाठी थकबाकी भरून टाळाटाळ, ऑनलाईन शिक्षणात अडचण
Goa Honda villege No light
Goa Honda villege No light Dainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले : होंडा (Honda) पंचायत क्षेत्रातील (Goa) पोस्तवाडा परिसरात सन १९८१ पासून वास्तव्यास असलेल्या फिरोजा शाह (Firoja Shah) या मुस्लिम समाजातील महिलेचे कुटुंब गेल्या चार वर्षांपासून अंधारात दिवस काढीत आहे. थकबाकी भरूनसुद्धा अद्याप वीज जोडणी पूर्ववत करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंधारात जगावे लागत आहे. वीज जोडणी (No Light) नसल्यामुळे मुलांच्या ऑनलाईन शिक्षणात (Online Education) अडचण निर्माण झाली आहे. फिरोजा शाह म्हणाल्या, सासरे इस्माईल शाह यांच्या नावावर ते घर होते. त्याप्रमाणे घराची रीतसर नोंदणी होंडा पंचायतीत झालेली आहे. त्यामुळे सदर घराला इस्माईल शाह यांच्या नावावर वीज व पाण्याचे कनेक्शन मिळाले. परंतु काही वर्षांपासून या भागात खाण बंदी व त्यानंतर आलेल्या कोविड१९ माहामारीच्या निर्बंधांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शाह कुटुंबांच्या घराला दिलेल्या वीज बिल थकले. त्यामुळे वीज खात्याने सदर घराची वीज जोडणी बंद केली. फिरोजा यांच्या सासऱ्याचे निधन झाल्यानंतर सदर घर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून होंडा पंचायतीत त्यांचे पती व एक दीर यांच्या नावावर रीतसर हस्तांतरण (ट्रान्स्फर) झाले आहे. त्यामुळे फिरोजा (Firoja Shah) यांनी वाळपई वीज खात्याकडे संपर्क साधला असता थकबाकी भरा असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे १२८६५६ रुपये वीज खात्यात भरण्यात आले. पण बील भरल्या नंतर त्यांना सांगितले, सदर घराच कनेक्शन कायम स्वरुपी तोडण्यात आले असल्याने जोडणी देण्यात मिळणार नाही, त्यासाठी नवीन प्रक्रिया करावी लागणार, त्यामुळे पैसे भरूनसुद्धा शाह कुटुंबाला अंधारात दिवस काढावे लागत आहे.

Goa Honda villege No light
Goa: चिकण, मटन विक्रीत होऊ शकते मोठी वाढ

शाह (Firoja Shah) कुटुंबांनी पंचायतीकडे रीतसर कागदपत्रे सादर करून वीज जोडणीसाठी ‘ना हरकत’ दाखला मागितला, पण पंचायतीच्या क्षेत्रात घर नोंदणी क्रमांक असतानासुद्धा तीन महिने झाले तरी अद्याप दाखला मिळाला नाही. उताऱ्यावर नाव नसल्याने आरोग्य केंद्रातर्फे ‘ना हरकत’ दाखला देण्यास नकार देण्यात आला. वीज जोडणी नसल्यामुळे मोडकळीत आलेल्या घराची दुरुस्ती करता येत नाही, शिवाय घरात तीन मुले आहेत. त्यांच्या शिक्षणातही अडचण येत आहे, असे फिरोजा यांनी सांगितले. फिरोजा (Firoja Shah) यांच्या तीन मुला पैकी एक मुलगी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे, तर एक मुलगा इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे, पण घरात वीज नसल्याने शेजारच्या घरात बसून शिकावे लागत आहे. सदर घराची वीज जोडणी तोडल्या नंतर या घराच्या एका खोलीत असलेल्या पोस्तवाड्यावरील अंगणवाडीचा कारभारसुद्धा काळोखातच सुरू आहे. सध्या कोविड प्रतिबंधक नियमांमुळे मुले येत नसली तरी कर्मचाऱ्यांची इतरइतर कामे करताना अचडण येत आहे.

Goa Honda villege No light
Goa: दिल्लीच्‍या शैक्षणिक प्रगतीने महादेव नाईक भारावले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com