Sameer Amunekar
कोकणातील गड नदी (कालावली)च्या काठावर असलेला रामगड हा लहानसा पण बळकट व निसर्गरम्य किल्ला आहे.
पक्क्या रस्त्यापासून रामगड गावातून फक्त दहा मिनिटांत गडावर पोहोचता येते, परंतु पर्यटकांकडून दुर्लक्षित राहिला आहे.
मालवण–कणकवली मार्गावर उंचावर वसलेले रामगड गाव लहान असून त्याच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत हिरवाईने नटलेला आहे.
गावातील लाकडाच्या कारखान्याजवळून उजव्या बाजूने जाणारी वाट घ्यावी; पाच मिनिटांत पाण्याची टाकी लागते आणि थोडा चढ चढल्यावर गडाचा प्रवेशद्वार दिसते.
गडाचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या मध्ये लपलेले आहे. हे दोन बुरुज दरवाज्याच्या बाहेर सुमारे १५ ते २० फूट पुढे वळवलेले आहेत.
दरवाजापुढील मार्ग दोन बुरुजांमध्ये असल्याने तो संपूर्णपणे बुरुजांच्या तोफा किंवा शस्त्रांच्या आवाक्यात येतो. ही रचना संरक्षणात्मक दृष्ट्या अत्यंत बुद्धिमान आहे.
रामगड हा जांभ्या दगडात चुन्याचा किंवा इतर कोणत्याही लेपाशिवाय बांधला गेला असून त्यामुळे त्याची बांधणी नैसर्गिक व टिकाऊ आहे.