CM Apprenticeship Policy: सरकारी आणि खासगी क्षेत्रात अप्रेंटीसशीपची मोठी संधी, दहा हजार युवकांना मिळणार लाभ

कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्यावतीने तरुणांसाठी प्रशिक्षणाच्या मौल्यवान संधी
CM pramod sawant
CM pramod sawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्यावतीने सरकारी आणि खासगी क्षेत्रात 10 हजार उमेदवारांना मुख्यमंत्री अप्रेंटीसशीप (Apprenticeship) योजनेखाली आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. 10 हजार तरुणांसाठी ही प्रशिक्षणाच्या मौल्यवान संधी असणार आहे.

संबंधित विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील तरुणांमध्ये रोजगार क्षमता वाढवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त राज्यातील 10 हजार तरुणांना हे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून नंतर प्रशिक्षणार्थींना अप्रेंटीसशीप पत्रे सुपूर्द केली जातील.

CM pramod sawant
Goa Monsoon 2023: मांद्रेत 400 वर्षांचे पिंपळाचे झाड कोसळले
CM Apprenticeship Policy
CM Apprenticeship PolicyDainik Gomantak

कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्यावतीने मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी खात्यांमध्ये 2,700 तसेच खासगी क्षेत्रात 4, 885 संधी आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in वर नोंदणी करण्यासाठी लॉग इन करण्याचेही कळवण्यात आले आहे.

काय आहे योजना?

शिक्षण पूर्ण केलेल्या तसेच शिक्षण अर्धवट सोडलेल्या युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्यावतीने एक वर्षासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

CM pramod sawant
Netravali: नेत्रावळी येथील मैनापी धबधब्यावर दोघेजण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

तर काही दिवसांपूर्वी साखळी येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारी नोकरीचा हट्ट धरू नये असे आवाहन युवकांना केले होते. कार्यक्रमात बोलताना ते असे म्हणाले होते की, "आज सरकारी नोकरीच हवी हा हट्ट न धरता आदरातिथ्य, पर्यटन, आरोग्य, योग शिक्षक अशा चौफेर क्षेत्रात हजारो संधी उपलब्ध आहेत.

वैद्यकीय, आयुर्वेदिक व इतर क्षेत्रात अनेक विभागात शेकडो तंत्रज्ञान तज्ज्ञ हवे आहेत. त्यासाठी अनेक स्वरूपाचे अभ्यासक्रम साखळी भागात सुरू आहेत. त्याअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यास शंभर टक्के रोजगार उपलब्ध होत आहेत.

त्यामुळे युवा पिढीने निराश न होता नवनवीन तंत्र कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच इतरांनाही प्रेरणा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com