Goa Crime: गळा चिरुन डोकं केलं वेगळं; आठ वर्षापूर्वीच्या खून प्रकरणातील संशयिताची जन्मठेप रद्द

Nuvem Murder Case: २०१७ मध्ये मायणा - कुडतरी पोलिसांना एका अज्ञाताचा मृतदेह अंजूस - नुवे येथील डोंगराळ परिसरात सापडला होता.
Court Order
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नुवे येथे ८ वर्षांपूर्वी झारखंडच्या २५ वर्षाय काजू याच्या खूनप्रकरणी मडगाव येथील सत्र न्यायालयाने आरोपी ईप्पील धनवार याला दिलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरविली. आरोपीने शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आरोपीला दिलेली शिक्षा त्याच्याविरुद्ध सादर केलेल्या पुराव्यावरून सिद्ध होत नसल्याचा निष्कर्ष काढून हा निर्णय दिला आहे.

२०१७ मध्ये मायणा - कुडतरी पोलिसांना एका अज्ञाताचा मृतदेह अंजूस - नुवे येथील डोंगराळ परिसरात सापडला होता. त्याची मान तीक्ष्ण हत्याराने कापून डोके शरीरापासून वेगळे केले होते. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

पोलिस तपासावेळी मृतदेहाची ओळख पटली व तो ‘काजू’ नामक तरुणाचा असल्याचे सिद्ध झाले होते. त्याचा खून २१ ते २३ मे २०१७ च्या रात्री करण्यात आला होता. आरोपीने त्याची अमानुषपणे हत्या केली होती. पोलिसांनी या हत्‍येचा शोध घेताना काजू व धनवार याच्यात शाब्दिक बाचाबाची नेहमी होत होती. काजू याच्या हत्येनंतर धनवार गोव्यातून पसार झाला होता.

Court Order
Calangute Crime: मध्यप्रदेशातील महिलेच्या खून प्रकरणी नवी अपडेट! दिल्लीतील दोघेजण ताब्यात; कळंगुट पोलिसांनी दिली माहिती

त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्याचा शोध घेऊन झारखंड येथील कोईबिरा या गावातून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याने हत्या करण्यासाठी वापरलेले हत्यार जप्त केले होते. तपासकामाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मडगाव सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरून खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

Court Order
Goa Crime: 13 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; व्हडलेभाट-ताळगावातील धक्कादायक घटना

ठोस पुराव्यांअभावी शिक्षा रद्द

सत्र न्यायालयाच्या शिक्षेला आरोपी ईप्पील धनवार याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याला देण्यात आलेली शिक्षा परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे देण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध कोणतेच ठोस पुरावे पोलिसांनी सादर केलेले नाहीत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही शिक्षा रद्द करण्याची विनंती त्याने केली होती. उच्च न्यायालयाने या शिक्षेप्रकरणी सरकारी वकील व आरोपीच्या वकिलांची बाजू ऐकून घेऊन ही शिक्षा रद्द ठरविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

America Double Murder Case
Goa High Court Premature Release
 Anmod Forest Murder Case
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com