Goa: चोर्लातून अवजड वाहतूक सुरूच

Goa: पोलिसांचेही दुर्लक्ष ः बंदी आदेशाचे उल्लंघन, रस्त्यावर खड्डे
Goa: Heavy vehicles descending through Chorla Ghat.
Goa: Heavy vehicles descending through Chorla Ghat.Sanjay Ghugretkar

खांडोळा ः उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांसाठी (Heavy vehicle) चोर्ला घाट (Chorla Ghat) बंदीचा आदेश देऊनही घाटातून नियमितपणे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घाटातील अंदाधुंद वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत असून वळणावळणावर या अवजड वाहनांमुळे छोटी वाहने चालविणे कठीण होत आहे. काही ठिकाणी एप्रिल २०२१ मध्ये केलेल्या रस्त्यांवर खड्डेही (Pits on roads) पडले आहेत. त्यामुळे या घाटातून प्रवास असुरक्षित (Insecure) होत आहे. संबंधित वाहतूक खात्याबरोबरच पोलिसांचेही या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे.

Goa: Heavy vehicles descending through Chorla Ghat.
Goa: गुळेली विद्यालयाच्या शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै १ ते डिसेबर ३१, २०२१ पर्यंत अवजड वाहनांसाठी हा महामार्ग बंदीचा आदेश काढला होता, परंतु रस्त्यावर कुठेही या बंदीचा नवा फलक लावलेला नाही. गोव्याची हद्द संपल्यावर आणि पुढे सुर्ला गावाजवळ असे दोन फलक बंदी आदेशाचे आहेत. ते २०१९ आणि २०२० साली दिलेल्या आदेशाचे आहेत. परंतु गेल्या दोन वर्षात या आदेशाचे कोणीही गांभिर्याने पालन करीत नाहीत. बेळगावहून येणारी अवजड वाहने मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या वेळी या रस्त्यावर दिसतात. शिवाय केरीतील तपासणी नाक्यावरूनही त्यांना पुढे सोडले जात आहे. हैदरबाद, बेंगलोर, अहमदाबाद, विजापूर, बागलकोट, रायचूरसह बेळगाव, हुबळी, धारवाड, सौंदत्तीसह इतर ठिकाणी जाणाऱ्या बसेस याच मार्गाने धावतात. अनमोड घाट बंद झाल्यामुळे सर्व प्रवासी वाहतूक याच मार्गाने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. रस्ता दुरुस्ती झाली, ही बाब प्रवाशांसाठी दिलासा देणारी असली तरीसुद्धा अवजड वाहतुकीमुळे जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत. साखळी - चोर्लाघाट - बेळगाव रस्ता हा मुळात बेळगाव या व्यापारी शहरासाठी जोडणारा रस्ता एरव्ही छोट्या वाहनांसाठी वापरला जात होता. सप्ताहाच्या शेवटी बेळगावला जाऊन शॉपिंग करणाऱ्यांसाठी सोयीचा रस्ता होता. परंतु आता अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे नव्याने केलेला हा रस्ताच उद्ध्वस्त होत आहे. जांबोटीजवळच्या मलप्रभेवरील ब्रिटिशकालीन पूलही धोकादायक आहे. तरीसुद्धा तेथून ही अवजड वाहने येतात. त्यामुळे तेथेही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

सीमेवर वाहतूक पोलिस हवा
गोव्याच्या हद्दीत ही वाहने दिवसा घुसतात, घाटात जागोजागी थांबतात, तर काही वाहने सरळ पुढे येऊन चलन देऊन गोव्यात शिरतात. बंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी ही वाहने गोव्याच्या सीमेत प्रवेश करण्यापूर्वीच आडवावी लागतील. त्यांना सीमेवरूनच परत पाठविल्यास घाटात होणारी वाहतूक कोंडी कमी होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com