Goa: मुसळधार पावसाचा जोर अधिक; केपेत कुशावती नदीला पूर

केपेतून (Cape) वाहणारी कुशावती नदीला (Kushavati River) ही पूर आला असून पाऊस असाच सुरू राहिल्यास आज पारोडा पूल पाण्याखाली जाऊ शकतो.
Kushavati River
Kushavati RiverDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी वलावली असल्याने राज्यातील नदयामध्ये पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. केपेतून (Cape) वाहणारी कुशावती नदीला (Kushavati River) ही पूर आला असून पाऊस असाच सुरू राहिल्यास आज पारोडा पूल पाण्याखाली जाऊ शकतो.

Kushavati River
केपे-पिरला ग्रामस्थांचे वन हक्क प्रकरणी वनविभागाविरोधात आंदोलन

राज्याला पावसाने जोरदार झोडपले असून सर्वत्र पाणी साचल्याने सामान्य लोकांना याचा बराच फटका बसला आहे. दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे कुशावती नदीला पूर आला असून पाऊस असाच सुरू राहिल्यास दर वर्षीप्रमाणे पारोडा येथील पूल व मडगाव(Madgaon) कुडचडेला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली जाणार आहे. गेल्या अनेक वर्ष्यात कुशावती नदीत साचलेला गाळ व मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे काढली नसल्याने पावसात या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना जास्त त्रास होतो.वेळोवेळी लोकांनी या संबंधी मागणी करून सुद्धा संबधित खात्याने या कडे दुर्लक्ष केले असल्याचे लोकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Housing Board Home Regularisation
22 Villages Exclusion Proposal Goa
Bombay High Court Goa Bench Tarun Tejpal
Illegal Activities At Goa Tourist Places
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com