गोवा आरोग्यमंत्र्यांच्या पत्नीचे गोवन महिलांनी स्वावलंबी होण्याचे आवाहन

आजच्या काळातील महीला अबला राहीली नाही, विविध स्तरांवर स्पर्धा करून महिलांनी सुद्धा उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त केले आहे, त्यामुळे सुशिक्षित महिलांनी स्वतःला कमजोर न समजता स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
भुईपाल भेडशेवाडा येथिल महीला संवाद बैठकीत बोलताना डॉ दिव्या राणे, बाजूला इतर मान्यवर
भुईपाल भेडशेवाडा येथिल महीला संवाद बैठकीत बोलताना डॉ दिव्या राणे, बाजूला इतर मान्यवरDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: आजच्या काळातील महीला अबला राहीली नाही, विविध स्तरांवर स्पर्धा करून महिलांनी सुद्धा उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त केले आहे, त्यामुळे सुशिक्षित महिलांनी स्वतःला कमजोर न समजता स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी सरकारच्या विविध योजना असून त्याचा लाभ घ्यावा, यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास बिनधास्त पणे आपणाशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या अर्धांगिनी सामाजिक कार्यकर्त्या डॉ दिव्या राणे यांनी भुईपाल भेडशेवाडा येथे आयोजित केलेल्या महिला संवाद बैठकीत मार्गदर्शन करताना केले.

या प्रसंगी व्यासपीठावर होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, स्थानिक पंच सया पावणे, पांडुरंग गावकर, धनगर समाजाचे अध्यक्ष बि डी मोटे, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती वाडकर, आरती घोलकर, लक्ष्मी हरवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भुईपाल भेडशेवाडा येथिल महीला संवाद बैठकीत बोलताना डॉ दिव्या राणे, बाजूला इतर मान्यवर
बेरोजगारीमुळे आलेल्या नैराश्याने घेतला गोव्यातील 43 जणांचा जीव..

यावेळी डॉ दिव्या राणे पुढे म्हणाल्या की आजच्या सुशिक्षित पीढीला त्यांच्या शैक्षणिक पात्रते प्रमाणे रोजगाराची गरज आहे, त्यामुळे आज पर्यंत या भागाचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे साहेब आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्याने पर्ये तसेच वाळपई मतदार संघातील युवा युवतींना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे, त्यामुळे आज सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागात सुध्दा बरेच बदल झालेले दिसून येत आहेत, सार्वजनिक विकासा बरोबर मानवी विकास याच समतोल साधून सत्तरी तालुका विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या साऱ्या प्रयत्नांचे श्रेय सत्तरीतील जनतेला जात आहे, कारण गेल्या कित्येक वर्षांपासून पर्ये मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे साहेब आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना सहकार्य केल्यामुळे हे करणे शक्य झाले. अशाच प्रकारे आपला विश्वास कायम ठेवून सार्वगिण विकासाची पुर्ती करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

त्याच प्रमाणे सत्तरी तालुक्यातील महिला भगिनींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सरकारच्या माध्यमातून त्यांच्या महीला आणि बाल कल्याण खात्याच्या वतीने विविध योजना राबविल्या आहेत, त्याचा फायदा येथिल महिलांनी घेतला पाहिजे, त्यासाठी काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी डॉ दिव्या राणे यांनी करून उपस्थित महिलांच्या तसेच युवकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या कडे बऱ्याच युवक युवतींनी आपल्याला सरकारी नोकरी द्यावी म्हणून मागणी केली. यावर यावेळी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे नक्की या भागातील नागरिकांना नोकरीत प्राधान्य देणार असल्याचे डॉ दिव्या राणे हीने सांगितले.

यावेळी धनगर समाजाचे अध्यक्ष बि डी मोटे यांनी स्वागत करून या भागात विकासाचा पाया विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी घातला आहे, त्याच प्रमाणे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सार्वजनिक विकासाला चालना देताना मनुष्य विकास करण्यासाठी खुप हातभार लावला आहे, परंतू वाढत्या सुशिक्षित पीढीला आज रोजगाराची गरज आहे, त्यामुळे आपण आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या कडे ही समस्या उपस्थित करून समाजातील युवा युवतींना रोजगारात प्राधान्य द्यावे अशी मागणी केली. त्याच प्रमाणे अद्याप या भागातील नागरिकांचा जमनीचा प्रश्न सुटला नसल्याने बऱ्याच समस्या निर्माण होत असल्याचे यावेळी त्यांच्या नजरेस आणून दिले.

भुईपाल भेडशेवाडा येथिल महीला संवाद बैठकीत बोलताना डॉ दिव्या राणे, बाजूला इतर मान्यवर
आंदोलनकर्त्या शिक्षकांना ‘आप’चा पाठिंबा

गेल्या कित्येक वर्षांपासून निवडणूका जवळ आल्या की बरेचजण विविध प्रकारच्या भुलथापा मारून निवडणूकीत उभे राहतात परंतु निवडणूक झाली की ते गायब होतात. परंतु या भागाचा विकास हा आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केला आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्याच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com