Vishwajit Rane: नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून न घेणाऱ्या डॉक्टरांना घरी पाठवणार; आरोग्यमंत्री राणेंचा सज्जड दम

Goa Health: माझ्या घरात ज्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या, तशा समस्या इतरांच्या घरी निर्माण होऊ नयेत, हा माझा प्रामाणिक प्रयत्न; विश्वजीत राणे
Mega Medical Camp, Mapusa
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोमंतकीयांना चांगल्या आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य खाते बांधील आहे. या सुविधा उपलब्ध करून देतानाच डॉक्टरांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन ते आत्मसात करून घेण्याची आवश्यकता आहे. जे डॉक्टर आधुनिक बदलापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर निश्चितपणे कडक कारवाई करू आणि संबंधितांना घरी पाठवू, असा सज्जड इशारा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिला.

शनिवारी (ता.१२) म्हापसा येथे आयोजित मेगा आरोग्य शिबिराचे उदघाटन केल्यानंतर मंत्री राणे बोलत होते. या शिबिराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, दंत महाविद्यालयाच्या डीन डॉ. आयडा नोरोन्हा, आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. रूपा नाईक, आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश परब आणि मान्यवर उपस्थित होते.

Mega Medical Camp, Mapusa
Foreign Investment Goa: गोव्यात उद्योग क्षेत्राला मिळणार गती! जर्मनीतील कंपनी करणार 330 कोटी रुपयांची गुंतवणूक

आरोग्य शिबिरे ही लोकांचे आरोग्य निरोगी रहावे म्हणून नवीन संकल्पना घेऊन भरवली जातात. जोपर्यंत लोकप्रतिनिधी लोकांपर्यंत जाऊन जनतेच्या अडचणी समजून घेत नाहीत, तोपर्यंत त्यात सुधारणा घडवली जाऊ शकत नाही. माझ्या घरात ज्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या, तशा समस्या इतरांच्या घरी निर्माण होऊ नयेत, हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. आरोग्याच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे राणे म्हणाले.

Mega Medical Camp, Mapusa
Goa Dowry Case: हुंड्यासाठी महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ; गोव्यात पती - सासूविरोधात गुन्हा

'स्टेट केअर' संकल्पना राबविणार

'स्टेट केअर' ही नवी संकल्पना घेऊन लोकांपर्यंत जाण्याचा आमचा पुढील तीन महिन्यांत प्रयत्न राहणार आहे. याचा लाभ बहुतांश आजारी तसेच वयोवृद्धांना करून दिला जाईल. त्यासाठी पूर्ण राज्यभर ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिरे भरवली जातील, असेही आरोग्यमंत्री राणे यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com