
पणजी: गोव्याच्या औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल म्हणून, जर्मनीतील नामांकित आणि आघाडीची तंत्रज्ञान कंपनी सीमेन्स गोव्यात गुंतवणूक करणार आहे. कंपनीनं गोव्यात ३३० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला, असून या माध्यमातून गोव्याच्या उद्योग क्षेत्राला गती मिळणार आहे.
सीमेन्स ही जगभरात आपली तांत्रिक प्रावीण्य आणि गुणवत्ता यासाठी ओळखली जाणारी कंपनी असून, औद्योगिक ऑटोमेशन, ऊर्जा व्यवस्थापन, वीज वितरण, आणि डिजिटलीकरण या क्षेत्रांत ती आघाडीवर आहे. गोव्यातील गुंतवणुकीद्वारे सीमेन्स कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवणार आहे.
सीमेन्स गोवा येथील महाव्यवस्थापक आणि स्थानिक प्रमुख महेंद्र वाणी यांनी या गुंतवणुकीबाबत माहिती देताना सांगितले, "गोव्यात आमच्या पाच फॅक्टऱ्या आहेत, हे गोवा राज्यातील आमचं मोठं योगदान आहे. आम्ही आमच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ करत आहोत", असं महेंद्र वाणी यांनी सांगितलंय.
गुंतवणूकीसाठी गोवा राज्य निवडण्यामागे राज्य सरकारचे औद्योगिक अनुकूल धोरण, सक्षम व कुशल मनुष्यबळ, आणि सरकारकडून मिळणाऱ्या सोयी-सुविधा हे प्रमुख घटक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या गुंतवणुकीमुळे केवळ तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्रालाच चालना मिळणार नाही, तर गोव्यातील औद्योगिक पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे.
जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या जर्मन कंपनी सीमेन्ससाठी सुमारे ४५ कंपन्यांनी पुरवठा भागीदार बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करताना, सीमेन्स विविध क्षेत्रांत आपली उत्पादने पुरवत आहे. यात डेटा सेंटर्स, मेट्रो रेल, तेल आणि वायू, स्टील तसेच ट्रान्समिशन आणि वितरण क्षेत्रांचा समावेश आहे.
सीमेन्सचे स्ट्रॅटेजिक प्रोक्युअरमेंट प्रोटेक्शन अँड ऑटोमेशन विभागाचे प्रमुख स्टीफन रिट्झलर यांनी सांगितलं की, "सीमेन्स कंपनीचा विस्तार करण्यासाठी अधिक चांगले पुरवठादार आवश्यक आहेत. आमच्या कंपनीचे उत्पादन प्रकल्प विद्युतीकरण, स्मार्ट ऑटोमेशन आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर केंद्रित आहेत."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.