Goa Health Campaign: रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन

Goa Health Campaign: 100 नागरिकांना लाभ : पर्वरी आरोग्य केंद्र व धन्वंतरी वेलनेसचा पुढाकार
Health Campaign |Goa News
Health Campaign |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Health Campaign: पर्वरी आरोग्य केंद्रातर्फे रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट, पर्वरी आणि धन्वंतरी वेलनेस व योगेश्‍वरी आयुर्वेद, पर्वरी-गोवा यांच्या सहकार्याने 19 नोव्हेंबर रोजी साल्वादोर द मुंद ग्रामपंचायत सभागृहात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

येत्या 8 ते 11 डिसेंबर दरम्यान कला अकादमी, पणजी येथे आयोजिण्यात येणाऱ्या 9 व्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्‌घाटन जि. पं. सदस्य कविता गोपेश नाईक, पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर, साल्वादोर द मुंदच्या सरपंच रोशनी सावईकर, माजी सरपंच संदीप साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. मुकेश कसबेकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात आयुर्वेदाविषयी जागृती करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. परिषदेच्या आधी अशा प्रकारची शिबिरे गोव्यातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजिण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

या शिबिराचे आयोजन रोटरी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. संध्या कदम, पीएचसी पर्वरीचे डॉ. विकास नाईक, डॉ. प्रियांका बर्वे, डॉ. आदित्य बर्वे, डॉ. पूजा रेवणकर, डॉ. कन्हैया सिरसाट, डॉ. माधवी लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. माधवी लोटलीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आदित्य बर्वे यांनी आभार मानले.

Health Campaign |Goa News
Poor Road Condition: पणजीत रस्त्यांची दुरवस्था, माफी मागत महापाैरांनी केली मोठी घोषणा

आरोग्य एक्स्पो 2022ला भेट द्या

या शिबिराचा लाभ साल्वादोर द मुंद, पेन्ह द फ्रान्स आणि सुकुर अशा तीन पंचायत क्षेत्रांमधील 100हून अधिक नागरिकांनी घेतला. यावेळी लाभार्थींची विविध समस्यांबाबत तपासणी करण्यात आली. त्यात एफबीएस पातळी, बोन मिनरल डेन्सिटी आणि एचबी अशांचा समावेश होता.गोव्यात होणाऱ्या जागतिक आयुर्वेद परिषदेविषयी डॉ. आदित्य बर्वे यांनी माहिती दिली. तसेच ‘आरोग्य एक्स्पो 2022’ला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com