पेडणे : पालये येथे नळाद्वारे पाणीपुरवठा (Water supply) केल्या जाणाऱ्या पाण्यात आरोग्याला घातक द्रव्ये आढळली. सदर पाणीपुरवठा मानवी शरीराला अपायकारक असल्याचे पणजी येथील आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळेत (Panjim Health Testing Lab.) तपासणी केल्यानंतर स्पष्ट झाले आहे.
पालये गावासाठी कुपनलिकेपासून मिळणारे पाणी नळाद्वारे देण्यात येते. गेल्या उन्हाळ्यातील मे महिन्यापासून पालये गावाला पुरवठा करण्यात येणारे पाणी गढूळ असल्याने येथील माजी पंचायत सदस्य प्रेमानंद कदम यांनी हे पाणी पणजी येथील आरोग्य केंद्राच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले. तपासणीत त्या पाण्यात आरोग्याला घातक अशी प्रथिने सापडली. त्यामुळे अशा प्रकारचे पाणी पिणे आरोग्यास घातक आहे.
काय आढळले पाण्यात?
आरोग्य खात्याच्या प्रयोगशाळेत पृथक्करण करून दिलेल्या अहवालात क्लोराईड ६३.९, सल्फेट ९ एम. जी., ऑक्साबिलिटी ८, लोखंड ८६ एम.जी., सल्फेट ९ एम. जी. हे घटक मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. आरोग्य खात्याच्या प्रयोग शाळेत या पाण्याचे पृथक्करण केल्यानंतर अशा प्रकारचे पाणी मानवी उपयोगांसाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे.
पालये गावाला तीन - चार ठिकाणी कुपनलिकेद्वारे पाणी ओढून घेऊन नळाद्वारे ते पुरविण्यात येते. आरोग्य खात्याकडून हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल मिळाल्यावर प्रेमानंद कदम यांनी पेडणे पाणीपुरवठा कार्यालयाचे साहाय्यक अभियंते व पालये ग्रामपंचायतीत तक्रार नोंदविली. पण, अद्याप त्यावर कसलीही उपाययोजना केलेली नाही. सरकारने लोकांच्या जीवावर उदार होऊन खेळू नये, असे पालये गावातील ग्रामस्थांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.