Goa: घोगळ येथील नेहरु चिल्ड्रन पार्क उद्धाराच्या प्रतिक्षेत...

सदर पार्काचे उदघाटन 1 जुलै 1988 रोजी तेव्हाचे मंत्री लुईस प्रोत बार्बोज यांच्या हस्ते झाले होते (Goa)
Poor condition of Nehru Children's Park at Gogol - Margao (Goa)
Poor condition of Nehru Children's Park at Gogol - Margao (Goa)Dainik Gomantak

घोगळ येथे मडगाव कुडतरी रस्त्याच्या (Near Margao - Kudtari Road) केवळ 10 मिटर अंतरावर जवळ जवळ साडे तीन ते चार हजार चौरस जागेत नेहरु चिल्ड्रन पार्क आहे (Neharu Children Park). या पार्काचे उदघाटन 1 जुलै 1988 रोजी तेव्हाचे नगरपालिका मंत्री लुईस प्रोत बार्बोज यांच्या हस्ते झाले होते (Former Minister Luise Prot Barbos). तेव्हा मडगावचे नगराध्यक्ष संतोष पै रायतुरकर (Former Mayor Santosh Pai Raiturkar) होते. या पार्काचे डिझाईन आर्किटेक्ट अजित हेगडे (Architect Hegade) यानी केले होते. जेव्हा हे पार्क येथे सुरु करण्यात आले तेव्हा ही पडीक अशी जागा होती. सभोवताली शेती होती व क्वचितच आजुबाजुला छोटी मोठी घरे होते. पण आता या पार्काच्या चहुबाजुने बहुमजली इमारती झाल्या ्असुन रस्त्यावर राहिल्यास येथे पार्क आहे हे कळणे सुद्धा कठीण आहे.

Poor condition of Nehru Children's Park at Gogol - Margao (Goa)
Poor condition of Nehru Children's Park at Gogol - Margao (Goa)Dainik Gomantak

33 वर्षांपुर्वी जेव्हा हे पार्क सुरु करण्यात आले तेव्हा येथे कोण येईल हा प्रश्न होता. तरी सुद्धा काही संस्था येथे चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा किंवा इतर मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करीत. शिवाय म़डगाव मधील काही शाळा प्राथमिक मुलांना इथे सहलिला आणीत. पण आता या पार्कच्या सभोवताली असलेल्या इमारतीमध्ये कित्येक मुले आहेत, मात्र पार्क असुनही खेळता येत नाही अशी सद्याची अवस्था आहे. पहिल्या दहा ते पंधरा वर्षात नगरपालिकेने या पार्कची निगा व्यवस्थित पणे राखली मात्र गेल्या 15 वर्षांत या पार्कची स्थिती न घरका न घाटका अशी झाली आहे. जेव्हा या प्रतिनिधीने या पार्कला भेट दिली तेव्हा याला कोणी वाली नाही का असा प्रश्र्न मनामध्ये आला.

Poor condition of Nehru Children's Park at Gogol - Margao (Goa)
Poor condition of Nehru Children's Park at Gogol - Margao (Goa)Dainik Gomantak

झोपाळे, घसरगुंड्या, लपंडाव खेळण्यासाठी सुंदर जागा, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंच व प्रेक्षकांना बसण्यासाठी पायऱ्या असुनही हे पार्क असे ओसाड का पडले हा प्रश्र्न कोणाच्याही मनामध्ये येणे सहाजिकच आहे. हे पार्क म्हणजे पलिकडे राहण्याऱ्यांसाठी पायवाट झाली आहे. येथे उपद्रवी लोकांचा अड्डा असतो जे दारु पितात, सिगरेट ओढतात व ड्रग्स म्हण घेतात अशी तक्रार येथील एक नागरिक योगेश नागवेकर यानी केली. नगराध्यक्षानी व नगरसेविकेने येथे येऊन पार्कची पाहणी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Poor condition of Nehru Children's Park at Gogol - Margao (Goa)
Poor condition of Nehru Children's Park at Gogol - Margao (Goa)Dainik Gomantak

माजी आमदार दामू नाईक याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यानी सांगितले की हा भाग कुडतरी मतदारसंघात आहे व मडगाव नगरपालिकेचा प्रभाग 23 आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांत या पार्ककडे नगराध्यक्षांनी ढुंकूनही पाहिले नाही. 33 वर्षापुर्वी कदाचीत ही जागा पार्कसाठी येग्य होती पण आता विचार केला तर पार्कसाठी ही जागा योग्य नाही असे आपले मत आहे. या पार्कची निगा राखणे, दुरुस्ती करणे ही जबाबदारी नगरपालिकेची आहे असेही नाईक म्हणाले. सद्याच्या या प्रभागमधील नगरसेविका निमेशा फालेरो यानी या पार्क दुरुस्तीच्या कामात लक्ष द्यावे अशी स्थानिकांची मागणी होत आहे.

Poor condition of Nehru Children's Park at Gogol - Margao (Goa)
Goa : झोपाळे, घसरगुंडी गंजलीय, वाढली झुडपे

हे पार्काला पुर्वीचे वैभव मिळवुन देण्यासाठी खालील कामे करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम दरवाज्याच्या गेटी, पार्कची कंपाउंड भिंत दुरुस्त करणे, फ्लड लाईटद्वारे रात्रीच्या वेळी उजेड ठेवणे, बसण्यासाठी बांकाची व्यवस्था करणे. फुलझाडे लावणे, रंगरंगोटी करणे, जॉगिंगसाठी जागा उपलब्ध करणे, 24 तास सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणे, स्वच्छता राखण्यासाठी कामगारांची व्यवस्था करणे अशी स्थानिकांची मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com