Goa: "किती पैसे घेतेस?", गोव्यात 19 वर्षांच्या मुलीसोबत गैरव्यवहार! 'विदेशी पर्यटक' समजून अश्लील कमेंट्स; Video Viral

goa harassment viral video: गोव्याला भेट देण्यासाठी आलेल्या एका १९ वर्षीय भारतीय तरुणीला काही व्यक्तींनी विदेशी पर्यटक समजून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना
goa viral news
goa viral newsDainik Gomantak
Published on
Updated on

19 year old girl goa harassment: पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गोव्याला भेट देण्यासाठी आलेल्या एका १९ वर्षीय भारतीय तरुणीला काही व्यक्तींनी विदेशी पर्यटक समजून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही नराधमांनी तिच्यावर अश्लील आणि किळसवाण्या कमेंट्स केल्या, तसेच तिला "किती पैसे घेतेस?" असे विचारून तिचा विनयभंग केला.

तरुणीने 'तो' भयानक प्रसंग केला रेकॉर्ड

या १९ वर्षीय तरुणीने हा संपूर्ण लाजिरवाणा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ पोस्ट होताच तुफान व्हायरल झाला असून, या घटनेमुळे गोव्यातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

'विदेशी पर्यटक' समजून छेडछाड

व्हिडिओमध्ये स्पष्ट होते की, काही लोकांनी या भारतीय तरुणीला विदेशी पर्यटक समजले आणि तिच्यावर भडक आणि अश्लील टिप्पण्या केल्या. "ती किती पैसे घेते," असे विचारण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. केवळ १९ वर्षांच्या मुलीसोबत दिवसाढवळ्या अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन झाल्यामुळे गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तीव्र टीका होत आहे.

goa viral news
"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

संताप आणि कठोर कारवाईची मागणी

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पर्यटनासाठी गोव्यात येणाऱ्या महिला, विशेषतः एकट्या महिला, किती सुरक्षित आहेत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com